राजकीय

उद्योजक प्रशांत जोशी मनसेत दाखल; मराठवाड्यातील राजकारणाला मिळणार कलाटणी

बीड — बीड मातृभूमी व औरंगाबाद कर्मभूमी समजून औद्योगिक विश्वात शून्यातून विश्व निर्माण केलेले मराठी उद्योजक यांनी मनसे मध्ये प्रवेश करून नवा पायंडा निर्माण केला आहे. राजकीय क्षेत्रात चांगल्या अभ्यासू, समाजाची तळमळ असणाऱ्या, दांडगा व्यासंग व अजात शत्रू असलेल्या माणसांची उणीव नेहमीच भासत आली आहे. मात्र प्रशांत जोशींनी राजकीय क्षेत्रात पदार्पण करून चांगली माणसं ही या क्षेत्रात येऊ शकतात याचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आज पर्यंत कमवलेल्या दांडग्या जनसंपर्काचा फायदा पक्षाला होणार आहे. औरंगाबाद येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः प्रशांत जोशी यांचे पक्षात स्वागत केले लवकरच त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

———————————————-विधानसभेचे होवू शकतात दावेदार

प्रशांत जोशी यांच्या राजकारणातील प्रवेशाचे टायमिंग अतिशय अचूक ठरले आहे . महाराष्ट्रातील राजकिय परिस्थिती पाहता भविष्यात शिवसेना आणि दोन काँग्रेस यांची महाआघाडी कायम राहणार आहे . अशा वेळी भाजपला राज ठाकरेंसारखा प्रभावी नेता सोबत घेण्याशिवाय पर्याय नाही . भाजप – मनसे – रिपाई शिवसंग्राम – स्वाभिमानी ( खोत ) अशी महायुती होवू शकते . बीड जिल्हयात मनसेकडे विधानसभेसाठी अनेक प्रभावी चेहरे आहेत . त्यामध्ये प्रशांत जोशी यांची एक भर पडली असून भविष्यात ते विधानसभेचे दावेदार होवू शकतात .
————————————————–


प्रशांत जोशी हे गेवराई तालुक्यातील रांजणी येथील रहिवासी असून अनेक वर्ष त्यांनी बीड मध्येच स्थायिक आहेत. त्यांचे वडील श्रीधर राव जोशी हे कृषी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत तर त्यांचे एक बंधू प्रदीप हे रेल्वे विभागात अधिकारी आहेत. दुसरे बंधू दीपक हे बीडमध्ये व्यवसाय करतात. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रशांत जोशी यांनी नेहमीच वेगळी वाट चोखाळली.पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी बीडमध्ये नगरपालिका लढवून अनेक प्रस्थापितांना हादरा दिला होता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मराठा महासंघाने देखील जोशी यांना त्या वेळी जाहीर पाठिंबा दिला होता. नंतरच्या काळात राजकारणापासून अलिप्त राहून त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये आपला जम बसवला. हे करत असताना सर्वच राजकीय पक्षांतील मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांसोबत अगदी घरगुती संबंध प्रस्थापित केले. जनसंपर्क एवढा दांडगा निर्माण केला की त्यांच्या प्रत्येक शब्दाला वेगळीच किंमत दिली जाते.सामाजिक कार्यामध्ये देखील त्यांचा हिरीरीने घेतला गेलेला सहभाग उल्लेखनीय आहे. बीड मध्ये पहिल्यांदाच माधवबाग क्लिनिक सुरू करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये देखील त्यांचे तेवढेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अगदी सर्वच क्षेत्रामध्ये प्रशांत जोशी हे व्यक्तिमत्व अजातशत्रू म्हणून ओळखले जाते. चांगल्या व्यक्तिमत्त्वाने राजकारणात प्रवेश केल्यामुळे नव्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे मराठवाडा पातळीवर मनसेला चांगला चेहरा मिळाल्यामुळे पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजविण्यास मदत होणार आहे.
सुहास दशरथे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काही दिवसापुर्वीच मनसेमध्ये प्रवेश केला . पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः जोशी यांचे पक्षात स्वागत केले .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close