आपला जिल्हा

40 कोटीच्या गुटखा प्रकरणी एफआयआर रद्द करण्याचे न्यायालयाचे आदेश

बीड– येथील पेठ बीड पोलिसांनी एका गुटख्याच्या गोदामावर छापा मारला होता. यामध्ये गुटका आढळून आला नाही मात्र चाळीस कोटीचे काही कुपण आढळून आले होते. यावरून बीड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तो एफआयआर रद्द करण्याचे आदेश शुक्रवारी दिले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की पेठ बीड पोलीसांनी ठाणे हद्दीमध्ये एका गोदामावर छापा मारला होता. या ठिकाणी गुटखा आढळून आला नाही परंतु गुटख्याचे 40 कोटीचे कुपन आढळले होते. 40 कोटीची खरेदी-विक्री झाल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार तीन महिन्यापूर्वी घडला होता.

आढळून आलेल्या त्या कुपनच्या आधारे पोलीसांनी तब्बल 40 कोटीच्या गुटख्याची खरेदी विक्री झाल्याचा ठपका ठेवत महेबुब खान या व्यापार्‍याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पुढे यातील आरोपीला न्यायालयाने जामिन मंजूर केला. पेठ बीड पोलीसांनी दाखल केलेल्या या गुन्हयाच्या विरोधात आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली होती. त्यावर न्या. टी. व्ही. नलावडे यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान प्रत्यक्ष गुटखा न सापडल्याचा मुद्दा बचाव पक्षाने लाऊन धरला. त्यानंतर सदर एफआयआर रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बचाव पक्षाच्या वतिने अ‍ॅड.आदित्य सिकची यांनी बाजू मांडली. हा निकाल बीड पोलीसांसाठी एक धक्का मानला जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close