क्राईम

पन्नास कबुतर घेऊन चोरटा फुर्रर्

माजलगाव — अज्ञात चोरट्याने एका दुचाकीसह 50 कबुतरं फुर्रर् केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील उमरी येथे बुधवारी घडल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंद्रुड जवळ असलेल्या उमरी येथे सदाशिव मदन गिलबिले यांनी एम एच 44 एच 38 81 क्रमांकाची गाडी आपल्या घरासमोर उभा केली होती. ही गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबरोबरच ज्ञानेश्वर लक्ष्मण राऊत यांच्या तब्बल 50 कबुतरावर देखील चोराने डल्ला मारून रफूचक्कर झाला याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close