आपला जिल्हा

अंबाजोगाईत एकाच सरणावर 8 कोरोना बाधितांच्या मृतदेहांचे दहन

बीड — जिल्ह्यात कोरोना संख्या एकीकडे प्रचंड वाढत आहे तर दुसरीकडे मृतांचे आकडे देखील वाढताना दिसत आहेत. 1 ते 8 सप्टेंबर या आठ दिवसांमध्ये तब्बल 38 जणांचा कोरोना ने बळी घेतला. बळींची संख्या वाढत असल्यामुळे अंबाजोगाई मध्ये एकाच सरणावर 8 मृतदेह जाळण्याची वेळ आरोग्य विभागावर आली असल्याचा फोटो सध्या सोशल मीडियातून व्हायरल होत आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनलेला असतानाच मृतांचा आकडा देखील तसाच वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आतापर्यंत कोरोनाने 173 जणांचा बळी घेतलेला आहे. 1ते आठ सप्टेंबर या कालावधीत तब्बल 38 जणांचा कोरोना ने मृत्यू झाला. यातील बहुतांश जण हे वृद्ध व अन्य आजाराने पीडित असल्याचे सांगितले जात असले तरी रोज चार ते पाच जणांचा मृत्यू होत असल्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. त्यातच सहा सप्टेंबर रोजी कोरोना बाधित आठ मृतांचा अंत्यविधी मांडवा रोडवर असलेल्या न. प. च्या स्मशानभूमीत एकाच सरणावर केला असल्याचा फोटो सध्या सोशल मीडिया वरून होत आहे. मृतांची विल्हेवाट लावणे हेदेखील आरोग्य विभागाला डोकेदुखीचा विषय बनला असला तरी या फोटोमुळे मात्र चांगलीच खळबळ माजली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close