क्राईम

क्रूरकर्मा सुदाम मुंडे प्रकरणी पोलिसांचे हात पुराव्याअभावी अद्याप खालीच

बीड — अवैध गर्भपात प्रकरणातील क्रूरकर्मा सुदाम मुंडे यास रामनगर भागात दवाखाना उघडल्या प्रकरणी प्रशासनाने कारवाई करून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.मात्र तीन दिवस होऊन गेले असले तरी पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागले नसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पोलिसांनी त्याची मुलगी प्रियदर्शनी मुंडे व सोनोग्राफी सेंटर चालकाचा जवाब नोंदवला आहे.
अवैध गर्भपात व गर्भलिंग चाचणी प्रकरणात दहा वर्षाची शिक्षा भोगत असलेल्या सुदाम मुंडे याला न्यायालयाने जामीन दिल्यानंतर त्यांने रामनगर परिसरामध्ये शेतात दवाखाना उघडला. याची माहिती मिळतात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुदाम मुंडे ला अटक केली. न्यायालयाने त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. कोठडीत असताना सुदाम मुंडे हा पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे. या दवाखान्यामध्ये कोऱ्या चिठ्ठीवर औषध लिहिली जायची त्यामुळे औषधी लिहिलेली त्याचे नाव असलेली वा रजिस्ट्रेशन असलेली प्रिस्क्रिप्शन पोलिसांना अद्याप सापडलेले नाही. या कोऱ्या चिठ्ठीवरच मेडिकल मधून औषधे दिली जात होती. तसेच दवाखान्यामध्ये कोणी उपचार घेतले किती रुग्णावर उपचार केले गेले याची कुठलीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती सापडलेली नाही. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत त्याची मुलगी प्रियदर्शनी व एका सोनोग्राफी सेंटर चालकाचा जवाब नोंदवला आहे व तो काय तज्ञांकडे पाठवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी नियमाप्रमाणे तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close