आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात कोरोना जोरात रुग्णसंख्या पावणेदोनशे च्या घरात

बीड — जिल्ह्यात कोरोणाचे संक्रमण झपाट्याने वाढत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. 820 संशयित रुग्णांच्या अहवालामध्ये तब्बल 173 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 647 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान कोरोना मुक्त झालेल्या 90 रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे.
बाजारपेठ खुली झाल्यानंतर बीड जिल्ह्यात संक्रमणाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. मास्क , सॅनिटायझर चा वापर, सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब होत नसल्या चा परिणाम कोरोना ने ग्रामीण भागात हातपाय पसरले तर आहेतच शिवाय तरुण वर्गाला याची बाधा जास्त प्रमाणात होत असल्याचे गेल्या आठ दिवसातील अहवालावरून लक्षात येते. बीड जिल्ह्यात मंगळवारी तब्बल 173 रुग्ण आढळून आले आहेत.

अंबाजोगाई मध्ये 22, आष्टी मध्ये 11 तर बीड अर्धशतकाच्या उंबरठ्यावर जाऊन ठेवले आहे. 45 रुग्ण येथे सापडले आहेत. धारूर मध्ये चार गेवराई मध्ये पाच तर केज मध्ये बारा जणांचा अहवाल पॉझिटिव आला आहे. माजलगाव मध्ये पंधरा तर परळी मध्ये जवळपास सोमवार च्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे. सोमवारी 18 तर आज 32 रूग्ण सापडले आहेत. पाटोदा मध्ये तीन शिरूरमध्ये सात, वडवणी मध्ये 17 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सरकारी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे पाहावयास मिळत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close