महाराष्ट्र

पंकजा मुंडे ऊसतोड कामगारांच्या नेत्या नाहीत -ऊसतोड कामगार संघर्ष समिती

बीड — ऊसतोड मजुरांच्या प्रश्नासंदर्भात लवादमध्ये ऊसतोड मजूर व मुकादमांच्या बाजूने निर्णय होणे अपेक्षित आहे . मात्र गतवर्षी अनुभवाचा अभाव असलेल्या कोण्या एकाचे ऐकून तीन वर्षाचा करार पाच वर्ष करण्याचा निर्णय केला . यामुळे ऊसतोड कामगार व मुकादम यांच्या अडचणीत भर पडली . यावर्षी पुन्हा पाच वर्षाचा करार तीन वर्षाचा करण्याची मागणी ऊसतोड संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी करण्यात आली. माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या ऊसतोड कामगारांच्या नेतृत्वाला जिल्ह्यातूनच सुरूंग लागल्याचे पहावयास मिळत आहे. कोण्या एकाचे ऐकून निर्णय घेतल्यास एकही कोयता ऊसतोडणी ला जाऊ देणार नसल्याची खंबीर भूमिका घेण्यात आली आहे
यावेळी ऊसतोड कामगारांच्या नेत्या प्रा . सुशीला मोराळे , माजी आ . जनार्दन तुपे , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर , अशोक येडे , मोहन जाधव यांची उपस्थिती होती यावेळी पत्रकारांशी बोलताना प्राध्यापक सुशीला मोराळे म्हणाले की , ऊसतोड मजूर संघटनेने संपाचे हत्यार उपसले आहे . गतवर्षीचा वाईट अनुभव लक्षात घेऊन यावेळी लालबागमध्ये प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मत मांडण्याची संधी सरकारने द्यावी , ज्यांना कुठलाच अनुभव नाही.असे लोक लवाद मध्ये चर्चेला बसले होते . याचा परिणाम तीन वर्षाचा करार पाच वर्ष झाला .
याचा मोठा फटका ऊसतोड कामगारांना बसला आहे .ऊसतोड कामगारांच्या राज्यात तेरा संघटना असून कोण्या एका व्यक्तीचे ऐकून सरकार निर्णय घेणार असेल तर तो आम्हाला मान्य आहे. चर्चेला सर्वांनाच बोलावण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पुन्हा हा करार तीन वर्षाचा करावा , अशी मागणी आम्ही एकत्रित करत आहोत . याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऊसतोड कामगारांच्या भल्यासाठी कल्याण मंडळ स्थापन करावे , जेणेकरून ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचे व आरोग्याचे प्रश्न यामुळे मार्गी लागतील . अशी मागणी पत्रकार परिषदेत ऊसतोड कामगारांच्या नेत्यांनी केली .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close