आरोग्य व शिक्षण

सावधान : बीड जिल्ह्यात 198 कोरोना बाधित सापडले: तरुणांची संख्या 120 वर

बीड — जिल्ह्यात आज रुग्णसंख्या द्वि शतकाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली. 949 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये 198 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 751 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून अहवालामध्ये तरुण बाधित रुग्णांची संख्या आज देखील लक्षणीय आहे.चाळीस वर्ष वयाच्या आतील रुग्णांची संख्या 120 वर जाऊन पोहोचली आहे.ही येणाऱ्या काळामध्ये डोकेदुखी ठरणार असून तरुणांनी काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. युवकांनी आपले व देशाचे भविष्य उज्वल करण्यासाठी तरी किमान सरकारी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.ही महामारी चे संकट संपल्यानंतर या देशाच्या नवनिर्माणासाठी मजबूत खांद्याची आवश्यकता भासणार आहे. देश तरुणांचा आहे मात्र देशहितासाठी का होईना पण तरुणांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

जिल्हा कारागृहात चार कैदी पॉझिटिव आढळून आले आहेत. अंबाजोगाई मध्ये 17 रुग्ण सापडले असून यातील अकरा रुग्ण हे चाळीशीच्या आतील आहेत. आष्टी मध्ये 20 रुग्ण सापडले येथे देखील सोळा रुग्ण हे चाळीस वर्षे वयाच्या आतील आहेत. तर बीडमध्ये सुद्धा हीच परिस्थिती असून 41 रुग्णांमध्ये तब्बल 25 रुग्ण हे 40 च्या आतील आहेत. यामधील बारा रुग्ण हे रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत.गेवराई मध्ये 21जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यामध्ये देखील 12 बाधितांचे वय चाळीस वर्षे पेक्षा कमी आहे.धारुर तालुक्यात 8 रूग्ण सापडले आहेत. केजचा आकडा मात्र आज वाढला असून बाधितांची संख्या 31 वर जाऊन पोहोचली आहे. यामधील 19 जण हे तरुणच आहेत. 22 रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे संक्रमित झाले आहेत. माजलगाव मध्ये 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामधील दहाजण चाळीस वर्ष वयाच्या आतील आहेत. दोन रुग्ण हे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले आहेत उर्वरित नवीन रुग्ण आहेत. परळी तालुक्यामध्ये 28 रुग्ण सापडले असून यामधील 17 रुग्ण हे तरूनच आहेत.पाटोदा मध्ये दोन रुग्ण सापडले असून हे दोन्ही रुग्ण 25 व 34 वर्षे वयाचे असून ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी आहेत. शिरूर तालुक्यामध्ये दहा रुग्ण सापडले मात्र चार रुग्ण सोडता उर्वरित रुग्ण हे चाळीस वर्षे वयाच्या पुढील आहेत. वडवणी मध्ये चार रुग्ण सापडले असून एक तीस वर्षांच्याव्यक्तीचा व 98 वर्षे वयाच्या व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close