महाराष्ट्र

मूख्यमंत्री ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीला उडवून देण्याची धमकी दूबईहून दाऊद इब्राहिमच्या नावे देण्यात आली आहे. दरम्यान ‘ मातोश्री ‘ची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून आतापर्यंत तीन ते चार वेळा फोनवरून ही धमकी देण्यात आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर खळबळ माजली आहे.
दाऊद इब्राहिमवर मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बहल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. मुंबईतील या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 350 लोकांना आपला प्राण गमवावा लागला होता. तसेच 1200 हून अधिक लोक जखमी झाले होते. भारत सरकारने 2003 मध्ये अमेरिकेसोबत मिळून दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते.
दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून ही धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी या घटनेची माहिती घेतली असून पुढील सूचना दिल्या असल्याची माहिती आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close