आपला जिल्हा

काळा केक कापुन सरकारचा शिक्षक दिनीच विनाअनुदानित शाळेवरील शिक्षकांनी केला निषेध

बीड- विनाअनुदानित शाळेवरील शिक्षक अनेक वर्षापासून विनावेतन काम करत आहेत. शासन आदेश निघाल्यानंतर देखील शिक्षकांना वेतन मिळत नाही. या चाच निषेध करीत बीडमध्ये काळा शिक्षक दिन साजरा केला गेला. यावेळी शिक्षकांनी काळा केक कापून सरकारविरोधातील रोष व्यक्त केला आहे.

मागील अनेक वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षक विनावेतन काम करत आहेत आपल्याला पगार मिळावा या मागणीसाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलनं केली मागच्या वर्षी तसा जीआरही निघाला मात्र त्याचा काय झालं असा सवाल या शिक्षकांनी केला एक वर्षभरापूर्वी जिआर आला मात्र अद्याप पर्यंत कुठलीही कार्यवाही सरकारकडून केली जात नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी शिक्षक दिन काळा दिवस म्हणून साजरा केला, शासनाच्या निर्णयाचा आज काळा केक कापून साजरा केला. यावेळी शिक्षकांनी हाताला काळ्या फीती लावून आणि काही शिक्षकांनी काळे कपड़े परिधान केले होते.
वर्षभरापुर्वी शासनाचा आदेश निघाला त्याची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याने शिक्षक मुक्ता मोठे व जालिंदर जाधव यांनी सांगितले. संतप्त शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा विरोध केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close