क्राईम

बीड मधील बंजारा हॉटेलमध्ये आढळून आला मृतदेह;हत्या की आत्महत्या ?

बीड- बस स्टॅन्ड समोरील बंजारा हॉटेल मध्ये आरटीओ एजंट असलेल्या श्रीमंत (सिरपा) बन्सीधर सरवदे या 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह 5 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. मयताची ओळख पटली असून, तो बीड शहरातील पंचशिल नगर भागातील रहिवासी आहे. त्याचा हा मृत्यू घातपात असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

या घटनेबाबत बीड शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख गजानन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार मयताच्या अंगावर कुठेच मार लागलेला नाही. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच संबंधित व्यक्तीच्या मृत्यूचे कारण लक्षात येईल. अशी माहिती गजानन जाधव यांनी दिली आहे. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले असून पंचनामा करून शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close