आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात सापडले 110 कोरोना पाॅजिटीव रूग्ण

बीड — शनिवारी 1086 जणांच्या स्वॅब तपासणी अहवालात 110 रुग्ण नव्याने सापडले असून 976 जणांचे अहवाल निगेटिव आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे परळी चा शुक्रवारी वाढलेला आकडा शनिवारी कमी होऊन तो फक्त तीन वर आला आहे. या अहवालात देखील ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या लक्षणीय असून तरुणांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. तरुणांची बाधित होण्याची वाढती संख्या लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये नियमांचे पालन करणे तरूणांसाठी आवश्यक बनले आहे.
अंबाजोगाई — 27
डिघोळ आंबा येथे पाच रुग्ण उजनी येथे दोन रुग्ण, नागझरी परिसर तीन, बर्दापूर तीन, एसआरटी परिसर 5, माळीनगर दोन , आनंदनगर 2, दत्तनगर, मंडी बाजार, यशवंतराव चव्हाण चौक मुकुंदराज कॉलनी याठिकाणी ते रुग्ण नव्याने सापडले आहेत तर उर्वरित रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे.
आष्टी — 21
आष्टी हरिनारायण येथे पाच रुग्ण सापडले, भंवरवाडी रस्ता किन्ही दोन, पाण्याच्या टाकीजवळ देविनिमगांव सहा, भोसले वस्ती पिंपरी 2, वडार वस्ती बीड-सांगवी, आष्टी, खासबाग, ज्ञानदीप कॉलनी कडा, बस स्टँड जवळ धानोरा या ठिकाणी हे रुग्ण सापडले यातील बहुतांश रुग्ण हे 45 वर्षाच्या आतील आहेत.
बीड — 25
चौसाळा मध्ये आज देखील तीन रुग्ण सापडले असून खडकी येथे सुद्धा तीन रुग्ण सापडले आहेत शिवाजी धांडे नगर 2, छ. मिनार मज्जित जवळ व अजमेर नगर तसेच गोरे कॉलनी बालेपिर, पिंपळनेर आदर्श नगर फुलेनगर अंबिका चौक पाली संत नामदेव नगर, गोविंद नगर एमआयडीसी नाळवंडी इंद्रप्रस्थ कॉलनी, आशा टॉकीज जवळ शिक्षक कॉलनी, धानोरा रोड पोस्टमन कॉलनी या भागांमध्ये हे रुग्ण सापडले.
धारूर — 5
भोपा येथे दोन, क्रांती चौक, आजाद नगर, पाटील गल्ली मध्ये हे रुग्ण सापडले.
गेवराई — 8
संगमित्रा नगर चकलांबा बसवेश्वर कॉलनी विठ्ठल नगर रोहितळ तलवाडा धोंडराई मालेगाव येथे सापडलेल्या या रुग्णांमध्ये एकच रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे.
केज — 3
आयडीबीआय बँक कॉम्प्लेक्स, नांदुर घाट मध्ये दोन रुग्ण आढळले ‌
माजलगाव — 5
माजलगाव शहरांमध्ये पत्त्याचा शोध घेणे सुरू असलेले दोन, पिताजी नगर, मंजरथ रोड, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहे
परळी — 3
पंचशील नगर सापते नगर तसेच हेळंब मधील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव आहे
पाटोदा– 4
पाटोदा शहरातील तीन व डोंगरी येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव आला आहे.
शिरूर — 2
दगडी गल्लीमध्ये हे दोन रुग्ण नव्याने सापडले आहेत.
वडवणी — 7
वडवणी शहरातील 5, डोंगरवाडी व लक्ष्मीपुरी येथील एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close