देश विदेश

गुजरात मध्ये कचऱ्याच्या ढिगार्‍यावर देखील कोरोना बाधित मृतांचा पडला खच

राजकोट — कोरोना महामारी ते संकट तीव्र झाले असून गुजरात राजकोट मधील शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना ने मृत पावलेल्यासोबत अमानवी व्यवहार केला जात आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर देखील प्रेतांचा खच पडला असल्याचे धक्कादायक चित्र दैनिक भास्करने उघडकीस आणले आहे.

सौ. दैनिक भास्कर
देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या या दैनिकाने गुजरात चे विकासाचे खरे रूप उघडकीस आणले आहे. या दैनिकाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, रात्रीच्या वेळी कोरूना बाधित मृत व्यक्तीवर रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार मोठ्या प्रमाणावर करण्यात येतात.

दवाखान्यामध्ये मृत व्यक्तींची संख्या इतकी आहे की त्या प्रेतांची वाहतूक करणाऱ्या लोकांना खाण्यापिण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. दोन शव एकाच वेळी गाडीत टाकून स्मशान भूमी मध्ये दिली जातात. स्मशानभूमीत घेऊन गेल्यानंतर देखील त्या ठिकाणी वेटिंग वर राहावे लागते. शवागारामध्ये यापेक्षाही वाईट परिस्थिती दिसून आली. याठिकाणी एका कोपर्‍यात

सौ.दैनिक भास्कर

भिंती शेजारी नऊ प्रेत ठेवण्यात आले होते तर प्रेतां शेजारीच कचऱ्याचा ढीग पडल्याचे दिसून येत होते. एवढेच नाही तर एका प्रेतावर तर पॉलिथिन च्या पिशव्या आणि एक बॅग ठेवण्यात आली होती. रामनाथपुरा स्मशानभूमीमध्ये हिंदू धर्मावर अंत्यसंस्कार करण्यात येतात याठिकाणी सदर टीमने जाऊन अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तीबरोबर चर्चा केली असता त्याने सांगितले की आता दुपारचे एक वाजले असून आतापर्यंत आठ व्यक्ती वर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 15 वीस दिवसापासून परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली आहे की 24तास विद्युत शव दाहिनी सातत्याने सुरू आहे. या भट्टी च तापमान 600 डिग्री सेल्सियस असून कोरोना बाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी अडीच ते तीन तासांचा कालावधी लागतो. सामान्य व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी हाच वेळ फक्त एक ते दीड तासांचा असतो. आतापर्यंत या स्मशानभूमीतील भट्टी कधीही एवढा काळ सुरू नसल्याचं देखील त्यांने सांगितलं.
गूजरात मध्ये गुरुवारी कोरूना बाधित रुग्णांची संख्येने एक लाखाचा आकडा पूर्ण केला तर मृतांचा आकडा 3064 वर जाऊन पोहोचला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close