आपला जिल्हा

बीड — 95 नव्या कोरोना रुग्णांची भर

बीड– कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने होत असून गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये कोरोना बाधित व्यक्तीच्या सहवासात आल्यामुळे संक्रमित झालेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा जास्त संख्या ही नव्या रुग्णांची असल्याचे चित्र पहावयास मिळाले. 668 जणांच्या अहवालामध्ये 95 रुग्ण नव्याने आढळले आहेत. 573 जनांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. बर्दापूर पोलीस ठाण्याचे 3 कर्मचारी देखील पॉझिटिव्ह आले आहेत.
अंबाजोगाई — 18
सह्योग नगर यशवंतराव चव्हाण चौक येथे दोन, एसआरटी परिसर 2, बर्दापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तीन, धानोरा बुद्रुक मध्ये दोन, पाटील चौक, धनगर गल्ली, माळीनगर ,हातोला, धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, बर्दापूर चौबारा गल्ली, कांगणेवाडी येथे हे रुग्ण सापडले आहेत.
बीड — 27
तालुक्यातील चौसाळा येथे तब्बल सहा रुग्ण सापडले आहेत. तेली गल्ली मध्ये 2, भक्ती कंट्रक्शन, मित्र नगर, श्रीराम नगर कालिका नगर, भाजी मंडई, चंपावती नगर, दुर्गानगर भक्ती कंट्रक्शन, गणेश नगर नगर नाका, गोविंद नगर, राजुरी नवगन, नवी भाजी मंडई, तिरुपती कॉलनी, स्नेहनगर, काटेवाडा, क्रांतीनगर फुलेनगर, नाळवंडी नाका, शाहूनगर कबाड गल्ली यामधील तेरा रुग्ण हे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत.
गेवराई — 5
भगवान नगर मध्ये तीन, जज कॉर्टर, माऊली नगर मध्ये हे रुग्ण सापडले आहेत. हे पाचही रुग्ण नवीन आहेत.
केज–5
नांदुर घाट मध्ये दोन शिरूर घाट पिंपळगाव केवड या ठिकाणी हे पेशंट नव्याने सापडले आहे.
माजलगाव — 5
राजीवाडी, भट गल्ली, समता कॉलनी, माजलगाव पोलिस स्टेशन जवळ, माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा एक कर्मचारी, पॉझिटिव्ह आढळून आला आहे. एकच रुग्ण पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे बाधीत झाली आहे.
परळी –15
पेठ मोहल्ला, कन्हेरवाडी ,मारुती मंदिराजवळ, गणेश पार, पंचशील नगर मध्ये 2 कवठाळी तांडा, शिवाजीनगर मध्ये दोन, अरुणोदय मार्केट, समता नगर 2, मिरवत, प्रेम प्रज्ञा नगर, शास्त्रीनगर येथे हे बाधित रुग्ण सापडले. बुधवारच्या अहवालात ग्रामीण भागांची संख्या अधिक होती तर आज शहरी भागातील रुग्णांची संख्या अधिक आहे.
पाटोदा — 2
क्रांतीनगर व पाटोदा शहरातील एक रुग्ण आहे.
शिरूर — 6
विठ्ठल मंदिर गल्ली ,माळेगाव चकला, झापेवाडी, बुद्ध विहार समोर, संभाजी चौक कानोबा ची वाडी, बाजारतळ येथील हे रुग्ण असून सर्व नवीन आहेत म्हणजेच बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले नाही.
आष्टी — 5
देऊळगाव घाट येथे तीन तर हरिनारायण आष्टा येथे दोन रुग्ण सापडले आहेत हे सर्व रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले आहेत
धारूर — 3
कारी, कुंभार गल्ली, भोपा या ठिकाणचे हे रुग्ण आहेत
वडवणी — 4
वडवणी शहरांमध्ये तीन तर बाहेगव्हाण येथे एक रुग्ण सापडला आहे हे चारही व्यक्ती बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले नाहीत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close