आपला जिल्हा

बीड:ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव सुरूच, 95 रुग्ण सापडले

बीड — जिल्ह्यात आज 754 जणांचे अहवाल उपलब्ध झाले असून 659 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 95 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.विशेष महत्त्वाची बाब म्हणजे परळी चा आकडा कमी झालेला होता तो पुन्हा वाढलेला दिसून आला आहे. ग्रामीण भागात मात्र वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येण्याऐवजी आणखी वाढत आहे.
अंबाजोगाई –19
एसबीएच कॉलोनी रिंग रोड येथे रुग्णाच्या संपर्कात आलेले चार रुग्ण नव्याने सापडले आहेत. तसेच बर्दापूर पोलीस ठाण्यात कोरोना ने शिरकाव केला आहे. तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयाचा एक कर्मचारी, वरद पार्कमध्ये 2, योगेश्वरी नगरी 2, यशवंतराव चव्हाण चौक, अंबल टेक ग्रामीण, बर्दापूर ,कोठाड गल्ली, मंडी बाजार, भट गल्ली, निपाणी येथील हे रुग्ण आहेत.यामधील तेरा रुग्ण हे व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.
बीड — 20
चौसाळा शहरामध्ये आज पुन्हा नव्याने चार रुग्ण सापडले आहेत, क्रांतीनगर मध्ये दोन, रविवार पेठ तेली गल्ली 2, लोकाशा नगर, सहारा कॉलनी शहेनशहा नगर, रामतीर्थ एमआयडीसी परिसर, सावता माळी चौक, श्रीराम नगर, नवगण राजुरी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी,नाळवंडी धानोरा रोड धांडे गल्ली नगर नाका या ठिकाणी रुग्ण सापडले
धारूर — 4
गायकवाड गल्लीमध्ये दोन बाराभाई गल्ली,कांडी येथील 62 वर्षीय व्यक्तीच्या राहण्याच्या ठिकाणाचा शोध घेतला जात आहे.
वडवणी –3
वडवणी शहर सोबतच काडीवडगाव साळींबा येथे देखील नव्याने रुग्ण सापडले.
माजलगाव — 13
गजानन नगर मध्ये तीन , माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचे 2, पावर हाउस रोड दोन हनुमान चौक 2, कालिका नगर 2 तसेच पात्रूड मध्ये एक रुग्ण सापडला.
परळी — 25
हलगे गल्लीमध्ये 2, समतानगर तीन ,पंचशील नगर मध्ये 5, विद्या नगर मध्ये दोन, याबरोबरच कन्हेरवाडी, जायगाव, सेलू, लोणी मध्ये दोन, इंजेगाव मध्ये दोन ,कवठाळी तांडा, गणेश पार, गांधी मार्केट या ठिकाणी रुग्ण सापडले. सेलू आणि पंचशील नगर मधील एक रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले आहेत. उर्वरित सर्व रुग्ण हे नव्याने आहेत. याचाच अर्थ सुपर स्पेडर मार्फत हा फैलाव होत असल्याचे दिसत आहे.
आष्टी — 4
कडा, आष्टी वेस जवळ, हंबर्डे गल्ली, माळी गल्ली येथे हे नवे रुग्ण सापडले आहेत.
गेवराई — 1
मालेगाव बुद्रुक येथे 19 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शिरूर — 3
शिवाजीनगर, सुतार नेट कालिका देवी रोड येथे नवीन रुग्ण सापडले आहेत.
केज — 3
शिक्षक कॉलनी विठाई पुरम कळम रोड,सोनेसांगवी क्रमांक एक या ठिकाणी नव्याने रुग्ण सापडले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close