महाराष्ट्र

औरंगाबाद मध्ये तणाव: मशिद प्रवेशावरून खा. इम्तियाज जलील यांना अटक

औरंगाबाद — परवानगी नसतानादेखील मशिदीत प्रवेश करून नमाज अदा करण्यासाठी निघालेल्या एम आय एम च्या खासदार इमतियाज जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं खासदार जलील यांनी म्हटले आहे
विरोधक सध्या मंदिर मशीद उघडण्यात यावी अशी मागणी करत आहेत. यासाठी आंदोलन देखील करण्यात येत आहे. दरम्यान खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी शहागंज येथील मशिदीमध्ये प्रवेश करून नमाज अदा करण्यात ची घोषणा केली होती.परंतु त्यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून शहागंज मशिद परिसरामध्ये एम आय एम चे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले आहेत.काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तनात केला आहे.मशिद परिसरामध्ये कोणालाही प्रवेश मिळणार नाही असे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. दरम्यान एम आय एम खासदार इम्तियाज जलील यांनी हे आंदोलन प्रतीकात्मक होते ‌ मज्जित मध्ये हजारोंच्या संख्येने जाणार नव्हतो मात्र मोजक्याच लोकांना सोबत घेत मशिदीत जाऊन नमाज अदा करण्यात येणार होती.मात्र तेथे जाण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली. तसेच शहागंज शहागंज मशीद परिसरामध्ये कोणीही गर्दी करू नये असे आवाहन जलील यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close