महाराष्ट्र

काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे निधन

औरंगाबाद — काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे बुधवारी वयाच्या 91 व्या वर्षी सकाळी साडेसहा वाजता निधन झाले. औरंगाबाद मधील खाजगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांची प्रकृती गेल्या काही दिवसापासून खालावली असल्यामुळे त्यांना औरंगाबाद मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथून 1970 झाली त्यांनी सरपंच पद भूषवत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली . 1985 मध्ये त्यांनी वैजापुर तालुक्याचे आमदार म्हणून नेतृत्व केले हे पद त्यांनी 1995 पर्यंत कायम ठेवले. 1999 साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत खासदारकी मिळवली. या वेळी शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल यांचा त्यांनी पराभव केला होता. याशिवाय पंचवीस वर्ष जिल्हा बँकेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापतिपद महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुंबई येथे पाच वर्षे संचालक पद भुषविले. औरंगाबाद जिल्ह्यातील दिग्गज नेते म्हणून नावारूपाला आलेले रामकृष्ण बाबा पाटील यांची प्राणज्योत बुधवारी सकाळी साडेसहा वाजता मालवली त्यांच्या पश्चात दोन मुले सूना , दोन मुली, नातवंडं ,जावई असा परिवार आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close