आपला जिल्हा

प्रेमी युगलांचा विहिरीत आढळला मृतदेह

बीड- बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माटेगाव शिवारात मंगळवारी एका विहिरीत 17 वर्षीय मुलगा व 16 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. या दोघांनी आत्महत्या केली आहे की, काही घातपात आहे हे अद्याप पर्यंत समजू शकलेले नाही. मागील तीन दिवसापासून दोघेही फरार असल्याचे चकलंबा पोलिसांनी सांगितले.

गेवराई तालुक्यातील भाटअंतरवली रहिवासी असलेला शुभम रोहिदास कापसे (वय-१७) तर पाथरवाला खुर्द ता.गेवराई येथील कावेरी राजेंद्र खंदारे(वय-१६) असे मृतदेह सापडलेल्या दोघांची नावे आहेत या दोघांनी आत्महत्या केली आहे की काही घातपात झाला आहे याबाबत अजून स्पष्टता नाही आत्महत्या केली असेल तर कारण समजले नाही. मंगळवारी माटेगाव शिवारात एका विहिरीत प्रेते तरंगताना आढळून आले. ग्रामस्थांनी तात्काळ चकलांबा पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विहिरीतील मृतदेह बाहेर काढले. दोघांनी आत्महत्या केली की, घातपात या बाबत नेमके कारण मात्र समजू शकले नाही. या दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तरंगताना आढळून आले. घटनेची माहिती मीळताच चकलांबा पोलीस ठाण्याचे पो. नि. मारोती मुंडे, पो.कॉ. अमोल औसरमल यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून उमापूर प्रा.आ.केंद्रात शवविच्छेदना साठी आणले आहे. प्रा.आ.केंद्रात शववीच्छेदनाची प्रक्रीया सुरु आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलिस करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close