आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात सापडले एकूण 65 कोरोना रुग्ण

बीड — जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 517 संशयित रुग्णांचे स्वॅब मध्ये 65 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.452 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या अहवालात देखील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक आहे.
अंबाजोगाई — 9
माऊली नगर मध्ये तीन बन्सीलाल नगर मध्ये 2 मंडी बाजार, अमृतनगर मोरेवाडी, मुडेगांव व शेपवाडी येथे हे रुग्ण आढळले हे सर्व रुग्ण बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत.
बीड — 19
जिल्हा कारागृह वसाहतीत एक, जिल्हा कारागृहातील कैदी, याबरोबरच गणपती मंदिराजवळ सहयोग नगर मध्ये दोन, पिंपरगव्हाण रोड 2, पुनम गल्ली पेठ बीड दोन, याबरोबरच विद्या नगर पूर्व, नगर नाका, मित्र नगर, रविवार पेठ पुनम गल्ली अंबिका चौक पांगरी रोड,, यशवंतनगर, नगर रोड याबरोबरच ग्रामीण भागातील चौसाळ्यामध्ये 2, लिंबागणेश येथे रुग्ण सापडले.
धारूर — 4
काशिनाथ चौक, गायकवाड गल्ली, पाटील गल्ली, पहाडी पारगाव येथेसुद्धा नवीन रुग्ण सापडले.
केज — 5
काळेगाव मध्ये दोन, श्रीराम फॅब्रिकेशन च्या समोर, मसाजोग, नांदुर घाट येथे देखील रुग्ण सापडले.
माजलगाव — 8
फुले पिंपळगाव रोड, विवेकानंद नगर मध्ये 2, अशोक नगर, सोमठाणा, शाहू नगर मध्ये 2 राज गल्ली.
परळी — 12
नांदूर वेस, माणिक नगर, कवथळी, भीम नगर, पंचशील नगर, पद्मावती गल्ली, शास्त्रीनगर, प्रीती नगर, बँक कॉलनी, कवठाळी तांडा, स्नेह नगर मध्ये 2, रुग्ण सापडले यामधील तीन रुग्ण बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत.
शिरूर — 1
कोर्टाजवळ एक पन्नास वर्षीय महिला बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेली पॉझिटिव्ह आली आहे.
आष्टी — 1
क-हेवडगांव येथे 69 वर्षाची व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे.
वडवणी — 6
हरिश्चंद्र पिंपरी मध्ये दोन हे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत. चिंचवण तसेच वडवणी शहरांमध्ये तीन नवे रुग्ण आढळले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close