क्राईम

चुलत सासर्‍यांनेच केला सुनेवर बलात्कार

केज – चूलत सासऱ्यानेच नात्यातील सुनेवर गेल्या अकरा महिन्यापासून नवऱ्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत बलात्कार करत असल्याची घटना माळेवाडी येथे घडली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून आरोपीस तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

ऊस तोड कामगार असलेल्या व मोलमजुरी करून चरितार्थ चालवणारी ही पीडित महिला आहे. भावकीतील चुलत सासरा सतीश प्रभू चंदनशिव याने पीडितेच्या पतीबरोबर मैत्रीचे संबंध निर्माण केले. यातूनच तो नेहमी घरी ये जा करीत असे.एके दिवशी वस्तीपासून दूर अंतरावर गेल्याची संधी साधून हा चुलत सासरा घरी आला. यावेळी त्याने पीडितेशी लगट करण्याचा प्रयत्न केला मात्र विरोध होत असल्याचे पाहून त्याने तुझ्या पतीला जिवंत मारून टाकेल अशी धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. यावरही सातत्याने तो गेल्या अकरा महिन्यापासून अत्याचार करत होता. शेवटी पीडितेने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडत केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी सतीश प्रभू चंदनशिव यास तात्काळ अटक केली. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोनि.प्रदिप त्रिभुवन यांच्या मार्गर्शनाखाली फौजदार दादासाहेब सिद्धे हे करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close