आपला जिल्हा

ग्रामीण भागाला कोरोना चा विळखा, 94 रुग्ण सापडले

बीड — जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 667 जणांच्या अहवालात 572 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 94 रुग्ण नव्याने सापडले आहेत. निगेटिव्ह रुग्णांचा आकडा मोठा असला तरी ग्रामीण भागामध्ये कोरोना ने हात पाय पसरले असल्याचे चित्र चिंता वाढवणारे आहे‌ विशेष म्हणजे बीड तालुक्याचा आकडा कमी होण्याचं नाव घेत नाही. तब्बल 27 रुग्ण बीड तालुक्यात सापडले आहेत.
अंबाजोगाई — 12
निरपणा ग्रामीण, मोरेवाडी ग्रामीण मध्ये सहा,घाटनांदुर, कुंभार गल्ली, मंगळवार पेठ, अंबाजोगाई शहर, बारभाई गल्ली बरदापुर, भावठाणा येथे रुग्ण सापडले
आष्टी — 8
कन्हेरे वस्ती हरिनारायण आष्टा, कडा मध्ये दोन, सुर्डी, देवळाली, चिखली पोस्ट हिंगणी , देऊळगाव घाट देवी निमगाव मध्ये नवीन रुग्ण सापडले ‌ कडा व हरिनारायण आष्टा येथील दोन रुग्ण बाधित रुग्णाच्या सहवासातील आहेत.
परळी –5
गुरुकृपा नगर विद्यानगर शहरातील पत्ता माहीत नसलेली व्यक्ती, नंदनज, हिवरा गोवर्धन मधील व्यक्ती सोडता उर्वरित रुग्ण नवीन आहेत.
पाटोदा — 1
राहता गल्लीमध्ये 21 वर्षाच्या युवकास कोरोना ची लागण झाली आहे.
वडवणी– 4
वडवणी शहरातील तीन रुग्ण बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहेत तर हरिश्चंद्र पिंपरी येथे एक रुग्ण सापडला.
धारूर — 7
प्रतिभा नगर केज रोड, कुंभार गल्ली मध्ये चार हिंगणी बुद्रुक काशिनाथ चौक येथील हे रुग्ण आहेत. कुंभार गल्लीतील चारही रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेली आहेत.
गेवराई — 12
सावरगाव मध्ये तीन, दाभाडे गल्ली 2, धोंड्राई मध्ये दोन, मालेगाव मध्ये दोन, कुम्भे जळगाव, ताकडगाव रोड तसेच गेवराई पोलिस ठाण्याचा एक कर्मचारी पॉझिटिव आढळून आला आहे.
शिरूर — 5
तलाव पाटी वस्ती लोणी, खांबा मध्ये दोन, पाडळी व नारायणवाडी येथे एक रुग्ण सापडला.
बीड — 27
चौसाळा मध्ये दोन, मित्र नगर नवगण कॉलेज रोड या भागात दोन, माऊली अपार्टमेंट काशिनाथ नगर पांगरी रोड मध्ये 3,धांडे नगर, विद्यानगर पश्चिम, माऊली नगर, जमजम कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी, आदित्य नगर, विप्र नगर, नवी भाजी मंडई, तेलगाव नाका, पिंगळे गल्ली कारंजा रोड, लेडी रोड चंपावती नगर, रामतीर्थ एमआयडीसी परिसर, श्रीराम नगर दोन, संतोषी माता टॉकीज जवळ, बेलोरा, आहेर वडगाव फाटा, नवगण राजुरी, सावता माळी चौक व पात्रूड गल्लीत यामधील चार रुग्ण ही बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत.
माजलगाव — 11
सोन्नाथडी मध्ये दोन, खानापूर मध्ये दोन, सिद्धेवाडी, फुलेनगर, पावर हाउस रोड, दिंद्रुड, आंबेगाव, मेन रोड, शाहूनगर येथे हे रुग्ण सापडले.
केज — 2
विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ नांदुर घाट तसेच माधव नगर धारूर रोड येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close