देश विदेश

येथे ज्वालामुखीच्या टोकावर सातशे वर्षापासून केली जाते श्री गणेशाची पूजा

जकार्ता — इंडोनेशियामध्ये एकुण 141 ज्वालामुखी आहेत, ज्यापैकी 130 अजूनही सक्रिय आहेत, म्हणजे यामध्ये सतत स्फोट होत असतात. यापैकी एक आहे माऊंट ब्रोमो डोंगरावरील ज्वालामुखी. जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असल्याने इंडोनेशियात जाणाऱ्या पर्यटकांना येथील अनेक भागात जाण्यास बंदी आहे. परंतु, ज्वालामुखी धोकादायक असतानाही येथील लोक या डोंगरावरील प्राचीन गणेश मंदीरात जातात. त्यांना कुणीही रोखत नाही. त्यांची अशी श्रद्ध आहे की, गणेश पूजेमुळेच ते सुरक्षित आहेत.

माऊंट ब्रोमोचा अर्थ स्थानिक जावानीज भाषेत ब्रह्माशी संबंधित आहे. परंतु येथे मंदीर गणेशाचे आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, येथील मूर्ती 700 वर्षांपासून आहे. जी त्यांच्या पूर्वजांनी स्थापन केली आहे. गणेश मूर्ती जळणाऱ्या ज्वालामुखीच्या जवळ असूनही येथील लोकांचे रक्षण करते अशी श्रद्धा आहे.

म्हणूनच येथील पूर्व भागात वसलेला एक जातीसमुह, ज्यास Tenggerese नावाने आळखले जाते, तो श्री गणेशाची शेकडो वर्षांपासून पूजा करत आहे. हे गणेश मंदिर Pura Luhur Poten या नावाने ओळखले जाते. मंदिराची विशेषता म्हणजे येथे श्री गणेशाच्या विविध प्रकारच्या मूर्ती आहेत आणि सर्व मूर्ती ज्वालामुखीने तयार झालेल्या लाव्हाने बनल्या आहेत.

माऊंट ब्रोमोच्या जवळपासच्या 30 गावांमध्ये या जनजातीचे सुमारे 1 लाख लोक राहतात. ते स्वत:ला हिंदू मानतात. हिंदू रिती-रिवाज मानतात. काळाच्या ओघात यांच्या रिती-रिवाजात काही बुद्ध रिवाज सुद्धा जोडले गेले आहेत. जसे की हे लोक त्रिमूर्ती (ब्रह्मा, विष्णु, महेश) च्या पूजेसह भगवान बुद्धांची सुद्धा पूजा करतात.

सर्व रिती-रिवाजामध्ये एक विशेष पूजेचे Tenggerese मध्ये खुप महत्व आहे. ते प्रत्येक वर्षी 14 दिवसांसाठी माऊंट ब्रोमोच्या डोंगरावरील गणेश मंदिरात श्री गणेशाची पूजा करतात. या पूजेला ते Yadnya Kasada पर्व म्हणतात. 13व्या ते 14 शतकाच्या दरम्यान या पूजेला सुरूवात झाली. या पाठीमागे एक लोककथा आहे, ज्यानुसार देवाने तेथील राजा-राणी, ज्यांना संतती नव्हती, त्यांना 14 मुले दिली, या शर्थीवर की, 15 व्या आणि शेवटच्या संततीला ते डोंगराला अर्पण करतील. यानंतर प्रत्येक वर्षी पूजा आणि पशुबळीची प्रथा सुरू झाली. अजूनही येथे बकऱ्यांचा बळी दिला जातो.

सोबतच येथे ज्वालामुखीच्या आत या बळीसह फळे-फुले आणि हंगामातील भाज्यासुद्धा अर्पण केल्या जातात. असे मानले जाते की, श्री गणेशाची पूजा आणि धगधगणाऱ्या ज्वालामुखीला फळे अर्पण केल्यानेच त्यामध्ये स्फोट होत नाहीत. जर असे केले नाही तर येथील जनसमुदाय जळून नष्ट होईल, अशी त्यांची धारणा आहे.

या जमातीचे त्यांचे एक कॅलेंडर आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षी 14 दिवसांची पूजा होते. 14 दिवसांच्या उत्सवास Eksotika Bromo Festival म्हटले जाते. या सणादरम्यान डोंगरावर मोठी जत्रा भरते. ज्यामध्ये स्थानिक लोक विविध प्रकारच्या कला दाखवतात. यामुळे परदेशी पर्यटकांची येथे मोठी संख्या असते. मात्र, सतत तप्त असणाऱ्या ज्वालामुखीमुळे येथील तापमान जास्त असते. यामुळे पर्यटकांना श्वास घेण्यात अडचण आणि आरोग्याच्या समस्या असल्यास येथे येण्यास परवानगी नाही.

येथील पूजेच्या अनेक पद्धती हिंदूंशी मिळत्या-जुळत्या आहेत. तेथेही मंदिराचा पुजारी असतो, ज्यास Resi Pujangga म्हटले जाते. ते पूजाअर्चा करण्यास लोकांना मदत करतात. पुढे याच पुजाऱ्याचा मुलगाच पुजारी होतो. मोठ्या उत्सवात पुजाऱ्याचे तीन सहकारी असतात, ज्यांना Legen, Sepuh आणि Dandan म्हणतात.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close