आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात आढळले फक्त आणि फक्त 94 रुग्ण

बीड — जिल्ह्यातून आज 639 संशयित व्यक्तींचे स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते यामध्ये 541 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 94 नवे रुग्ण आढळून आले आहेत. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे शहरी भागातील संक्रमण ग्रामीण भागात पोहोचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
अंबाजोगाई –19
जवळगाव येथे चार रुग्ण सापडले आहेत, विवेकानंद नगर अनुराग कॉलनी, पोखरी रोड वर चार रुग्ण, बन्सीलाल नगर माऊली नगर, यशवंतराव चव्हाण चौक एकात्मता कॉलनी, न्यू बँक कॉलनी, कोठाड गल्ली, चंदन वाई भगवान बाबा चौक वाकडी व समर्थ नगर मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
आष्टी — 7
मातकुळी, धानोरा लक्ष्मी नगर कडा शहरात तीन तर एक रुग्ण मुर्शदपुर मध्ये सापडला.
बीड — 20
चौसाळा मध्ये दोन रुग्ण सापडले आहेत तर लिंबागणेश मोती पिंपळगाव मंजेरी हवेली च-हाटा याबरोबरच शहरातील बलभीम चौक आदर्श नगर वैशाली लाईट हाऊस नाळवंडी नाका जुना मोंढा पेठ बीड गांधिनगर नरसोबा नगर धानोरा रोड सावता माळी चौक बळीराम कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स जवळ गोविंद नगर, स्नेहनगर ढगे कॉलनी बार्शी नाका अंबिका चौक कृपा अपार्टमेंट सारडा नगरी सुभाष कॉलनी पेठ बीड मित्र नगर येथील हे रुग्ण आहेत.
धारूर –3
गावंदरा येथे दोन कारी येथे एक रुग्ण सापडला आहे. हे सर्व बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत.
गेवराई — 4
शहरातील विठ्ठल नगर जवळका व हिरापूर येथे दोन रुग्ण सापडले आहेत.
केज –18
आडस मध्ये तीन, श्रीराम फेब्रिकेशन जवळ धारुर रोड, सावंतवाडीमध्ये 6 काळेगाव, अहिल्यादेवी नगर, शुक्रवार पेठ, वाघे बाभुळगाव मध्ये पाच रुग्ण आढळले आहेत काळेगाव येथील रुग्ण सोडला तर उर्वरित रुग्ण बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत ‌
माजलगाव — 5
फुलेनगर, ग्रामीण रुग्णालयाचा एक कर्मचारी, गुंज थडी, माजगाव, नवा मोंढा माजलगाव येथे रुग्ण सापडले.
परळी –13
बँक कॉलनीमध्ये 2 दाऊतपुर गणेश पार, कन्हेरवाडी, माणिक नगर पद्मावती गल्ली दोन, इंजेगाव मध्ये तीन स्नेहनगर मोंढा मार्केट मधे हे रुग्ण आढळले.
शिरूर — 3
दगडी गल्ली कोळवाडी रोड शिरूर शिवाजीनगर मध्ये रुग्ण सापडले
वडवणी — 1
वडवणी शहरांमध्ये बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेली 65 वर्षीय व्यक्ती संक्रमित झाली आहे.
पाटोदा — 1
तालुक्यातील मंजरी येथे 40 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close