राजकीय

जिंतूर व मानवत समितीच्या प्रशासकीय मंडळास मुख्यमंत्र्याकडून स्थगिती

परभणी — शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भात राजीनामा नाट्याचा वापर करत खळबळ माजवून दिली.त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली त्यानंतर मानवत आणि जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय मंडळाला स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षात शिवसेनेची सरशी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे

शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जिंतूर समितीवरील प्रशासकीय मंडळाच्या मुदतवाढीच्या अनुषंगाने ‌मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यांच्याकडे दिलेल्या राजीनाम्यात स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादीच्या प्रशासकीय मंडळास दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय हा शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय असल्याच असे त्यांनी नमूद केलं होतं.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेवून त्या विषयाच्या अनुषंगाने नाराजी व्यक्त केली. याच बाबीची शिंदे यांनी दखल घेवून मुख्यमंत्री ठाकरे यांना जिंतूर व मानवत समितीवरील नेमलेल्या प्रशासक मंडळास स्थगिती द्यावी, अशी शिफारस दि.27 ऑगस्ट रोजी एका पत्राद्वारे केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिंदे यांच्या या पत्रावर जिंतूर व मानवत समितीवरील प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीबाबत तपासणी करावी तोपर्यंत स्थगिती देण्यात येत आहे, असे टिपणी करीत पणनच्या प्रधान सचिवांना आदेश दिला.दरम्यान, या अनुषंगाने पणन महासंघ व जिल्हा उपनिबंधक यांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुचना किंवा आदेश शनिवारी दुपारपर्यंत प्राप्त झाला नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close