देश विदेश

सर्वाधिक मुस्लिम असलेल्या ” या ” देशाच्या नोटेवर आहे गणपतीचा फोटो

जकार्ता — लंबोदर, विघ्नहर्ता,गजानन, कलानिधी अशा सहस्त्र नावांनी ओळखला जाणारा बाप्पा प्रत्येकालाच भूरळ घालणारी देवता..

कलावंतांना विशेष आकर्षित करणारा प्रत्येक आकारात साकारला जाणारा बुद्धीचा दाता असलेल्या या देवतेने तीन टक्के हिंदू असलेल्या बहुतांश मुस्लीम राष्ट्र असलेल्या इंडोनेशिया च्या नोटेवर देखील आपले स्थान मिळवले आहे हे विशेष..


मूस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियातील लोक गणपतीला कला विज्ञान शिक्षणाची देवता मानतात. त्यामुळेच हिंदूंचे प्रमाण अवघे तीन टक्के असले तरी या या देशातल्या वीस हजाराच्या चलनी नोटा वर गणपती बाप्पाचा फोटो आहे. काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था ढासळली त्यानंतर वीस हजाराची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेण्यात आला याचवेळी नोटांवर गणपतीचा फोटो छापण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. जेव्हापासून नोटेवर गणपतीचा फोटो छापण्यात आला तेव्हापासून या देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली असे येथील लोकांचे म्हणणे आहे. या देशातला व्यवहार रुपया मध्ये होतो वीस हजार रुपयाच्या नोटेच्या पुढच्या बाजूला गणपती बाप्पा चा फोटो आहे तर मागच्या बाजूला क्लासरूम चा फोटो आहे.
या नोटेवर इंडोनेशिया चे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचाही फोटो आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close