महाराष्ट्र

डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेणार ही अफवा पसरताच भक्तांची गर्दी

अहमदपूर — अहमदपूरमध्ये डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरल्यामुळे महाराजांच्या भक्तांनी मोठी गर्दी केली. १०४ वर्षांचे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आहे. मात्र महाराजांची प्रकृती चांगली आहे, भाविकांनी चिंता करु नये, असा संदेश देण्यात आला आहे ‌.

माझी प्रकृती चांगली आहे. काळजी करू नका. तुमची भक्ती आणि श्रद्धा माझं आयुष्य वाढवत आहे. गुरू भक्ती करा आणि मला व्यवस्थित रितीने जगू द्या’, असं महाराजांनी भक्तांना संदेश देत  म्हटले आहे .
                 दरम्यान शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे यांनी याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्तीस्थळा बाहेर (आश्रम) ते बोलत होते.मनोहर धोंडे म्हणाले की, “आप्पा (डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज) कोणतीही जिवंत समाधी घेणार नाहीत. त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे. काही लोकांना वाटत असेल की, त्यांनी लवकर समाधी घ्यावी म्हणजे आमचा मार्ग मोकळा होईल. असा विचार जे करत असतील त्यांचा बंदोबस्त नक्की केला जाईल. त्यांची तब्येत बिघडली आहे असं सांगून इथं अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे.”

पुढे बोलताना धोंडे म्हणाले की, “मी रात्री अर्धा तास आप्पांसोबत बोललो. त्यांची समाधी घेण्याची कुठलीही मानसिकता नाही. परंतु काही मंडळी मात्र आप्पांना ब्लॅकमेल करत आहेत. आप्पा कशा प्रकारे आपल्यातून नाहीसे होतील आणि कसा आमचा मार्ग मोकळा होईल, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातूनच काही अफवा समोर आल्या होत्या. आप्पांनी अन्नत्याग केला होता. परंतु काल त्यांनी पूजा करून प्रसाद खाल्ला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close