देश विदेश

तर दूचाकी होणार दहा हजार रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली –  केंद्र सरकार दुचाकीवरील जीएसटी कमी करणार असल्याचे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत.जीएसटी कमी झाला तर दुचाकींची किंमत आठ ते दहा हजार रुपयांनी कमी होण्याची शक्यता बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सांगितले.
राजीव बजाज यांनी म्हटले आहे की किचकट नियम व जास्त कर यामुळे दुचाकींची किंमत 35 हजार रुपयांनी जास्त आहेत.सर्वसामान्य वापर करीत असलेल्या दुचाकीवर 28 टक्के जीएसटी लावला जातो तो 18 टक्क्या वर आला तर किमती दहा हजार रुपयांनी कमी होतील. सद्यस्थितीत केंद्राने ग्राहकांच्या खरेदीला चालना देण्याची गरज निर्माण झाली नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.देशातील दुचाकी उत्पादक अतिशय स्पर्धात्मक वातावरणात निर्यात करीत असताना दुचाकीसाठीची निर्यात प्रोत्साहन योजना केंद्र सरकारने गुंडाळली आहे. त्यामुळे आमच्यासारख्या कंपन्यांच्या महसुलावर 300 कोटी रुपयांचा परिणाम झाला आहे. परकीय चलन मिळवून देणाऱ्या निर्यातीवरील प्रोत्साहन रद्द करणे बरोबर नाही. ते पुन्हा चालू करावे, असे बजाज यांनी सांगितले. जीएसटी कमी होण्याची शक्‍यता निर्माण झाल्याबद्दल सर्व वाहन उत्पादकांनी समाधान व्यक्‍त केले. कालपासून वाहन क्षेत्राचे शेअर निर्देशांक वाढत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close