आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात आढळले 106 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

पाटोदा पोलीस ठाण्यातील 6 कर्मचारी बाधित

बीड — जिल्ह्यात आज 623 स्वॅबच्या अहवालातून 106 रुग्ण नव्याने सापडले आहेत. 517 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दोन दिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली. ती आता पुन्हा वाढते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंबाजोगाई –14
एसआरटी परिसरात दोन मुकुंदराज कॉलनी मध्ये 2, कल्याण नगर मध्ये 2 परळी वेस मध्ये दोन, रँडी बाजार रविवार पेठ केशव नगर शिक्षक कॉलनी कोठाड गल्ली, मोरवाडी येथे रुग्ण सापडले.
धारूर — 19
कुंभार गल्ली मध्ये तब्बल दहा रुग्ण सापडले आहेत यामधील तीन रुग्ण नव्याने तर उर्वरित पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत. गावंदरा येथे तीन रुग्ण सापडले आहेत हे तिन्ही रुग्ण बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहेत‌. भोपा ,देवदहिफळ, केज रोड, कटघर पुरा, पोकळे वस्ती कारी, हिंगणी खुर्द येथे हे रुग्ण सापडले.
परळी — 6
दौनापूर, नाथनगर, स्नेहनगर, शंकर पार्वती नगर ,पद्मावती गल्ली, शहरातील एक रुग्ण आहे त्याच्या पत्त्याचा शोध सुरू आहे.
आष्टी — 4
टाकळी आमीया, कडा, हरिनारायण आष्टा, धामणगाव येथे रुग्ण सापडले.
बीड –18
चौसाळा शहरामध्ये पुन्हा दोन रुग्ण सापडले आहेत हे दोन्ही रुग्ण नवीन आहेत. सहयोग नगर मध्ये 2, मित्र नगर मध्ये 2, दीलावर नगर, धानोरा रोड दोन, गुरुकुल इंग्रजी शाळेत जवळ जालना रोड, बुंदेल पुरा, अंबिका चौक पुनम गल्ली रविवार पेठ, थिगळे गल्ली, गोर वस्ती बालेपीर, गोविंद नगर व सोमेश्वर नगर मध्ये तसेच सह्याद्री हॉटेल च्या मागे विद्यानगर पूर्व या भागात देखील रुग्ण आढळले.
केज — 10
बानेगाव नाथनगर भगवान चौक नांदुर घाट फुलेनगर हनुमान मंदिर जवळ बाभूळगाव बस स्टँड जवळ नांदुर घाट सावंतवाडी फुलेनगर रोजा मोहल्ला केज याठिकाणी रुग्ण सापडले.
माजलगाव –19
हनुमान चौकामध्ये दोन, शिवाजीनगर 2 , शेलापुरी येथे दोन ग्रामीण रुग्णालय माजलगाव चे चार कर्मचारी, मेन रोड या ठिकाणचे तीन, आदर्श नगर चिंचगव्हाण, पाटील गल्ली, बस स्टँड जवळ, विवेकानंदनगर, जुना मोंढा ,मंजरथ येथे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यामधील 17 रुग्ण नवीन आहेत तर 2 कोरोना पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत.
गेवराई — 7
रेवकी, मालेगाव बुद्रुक, शिवाई नगर, सविता नगर, दाभाडे गल्ली, शाहू नगर तांडा बंगालीपिंपळा, मालेगाव खुर्द येथील हे रुग्ण आहेत.
पाटोदा — 6
पाटोदा पोलीस ठाण्याचे सहा कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
शिरूर — 2
कोर्ट जवळ शिवाजीनगर व आनंदगाव मध्ये एक रुग्ण सापडला.
वडवणी — 1
वडवणी शहरात 70 वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close