महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंचा मंत्रिपदाचा राजीनामा ? ट्विटर प्रोफाइल वरून हटवला मंत्री असल्याचा उल्लेख

मुंबई — महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटर प्रोफाईलवरून महाराष्ट्र सरकारमधील मंत्री असल्याचा उल्लेख हटवला असल्यामुळे ते राजीनामा देणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
सोशल मीडियावर सुशांत राजपूत आत्महत्या केसमध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव सातत्याने घेतले जात आहे. सोशल मीडियावर रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांच्या कनेक्शनबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, रिया चक्रवर्तीने सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. रियाच्या माहितीनुसार आदित्य ठाकरे यांना ती ओळखत नाही. याच दरम्यान महाराष्ट्र सरकारमध्ये पर्यटन आणि पर्यावरण विभागाची जबाबदारी असणारे आदित्य ठाकरे यांनी आपले ट्विटर प्रोफाइल एडिट करून ’महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री’ असल्याचा उल्लेख हटवला आहे.

ट्विटर बायोमध्ये मंत्री असल्याचा उल्लेख नाही
महाराष्ट्राचे सीएम उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर बायोवर लिहिले आहे ’युवासेना अध्यक्ष, मुंबई जिल्हा फुटबाल असोसिएशन अध्यक्ष.’ मोठी बाब ही आहे की, पाच ऑगस्टला श्रीराम जन्मभूमी भूमीपूजनाचे मुंबईत अनेक होर्डिंग लावण्यात आले होते, यामधून सुद्धा आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र गायब होते.
त्याच वेळी महाराष्ट्राच्या राजकारणात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या यात्रेदरम्यान आदित्य त्यांच्या सोबत होते. तरीही होर्डिंगवरून त्यांचे छायाचित्र गायब आहे. अंदाज लावला जात आहे की, बहुतेक काहीतरी गडबड आहे. आता आदित्य ठाकरे यांनी आपले ट्विटर प्रोफाइल एडिट केल्याने ही शक्यता आणखी वाढली आहे.
विरोधक सुशांत केस मध्ये कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करत आहेत. महत्वाचे म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, सरकारचे यश आणि वाढती लोकप्रियता सहन न झाल्याने सुशांत केसवरून घाणेरडे राजकारण करत ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close