आपला जिल्हा

दुसऱ्या दिवशी लिंगायत समाजाने शवयात्रा तहसील कार्यालयात नेली; नकट्या प्रशासनाला मिरची झोंबली

धारूर — लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशी शव यात्रा थेट तहसीलदार यांच्या दालना पुढे घेऊन जाण्यात आली. या मूळे हादरलेल्या प्रशासनाने अखेर नमते घेत अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे.


लिंगायत समाज सातत्याने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावीत अशी मागणी करत होता यापूर्वी देखील शव यात्रा तहसील कार्यालयात घेऊन जाऊन रस्ता खुला करुन देण्याची मागणी केली होती. त्यावेळी समाजाची आश्वासनावर प्रशासनाने बोळवण केली. मात्र गुरुवारी 90 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्यानंतर शव यात्रा तहसील कार्यालयात घेऊन जाण्यात आली होती. यावेळी पुन्हा 31 ऑगस्टपर्यंत रस्ता खुला करुन देण्याच आश्वासन दिलं गेलं. मात्र आज पुन्हा एका व्यक्तीचे निधन झाल्यानंतर संतप्त झालेल्या लिंगायत समाजाच्या लोकांनी शव यात्रा तहसील कार्यालयात नेली

. आज चक्क प्रेत तहसीलदारांच्या दालनात समोरच ठेवण्यात आल्यामुळे प्रशासन चांगलेच हादरले. रस्ता खुला करून जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका समाजबांधवांनी घेतल्यानंतर प्रशासनाने नरमाईचे धोरण अवलंबिले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी पोलिसांना पाचारण केले. सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस पोलिस ताफ्यासह तत्काळ तहसील कार्यालयात पोहोचल्या. यानंतर समाज बांधव, तहसील व पोलीस प्रशासन यांच्यात रस्त्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार स्मशानभूमी रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close