क्राईम

प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासर्‍यानेच केला सुनेचा खून

अंबाजोगाई — कुऱ्हाडीच्या साहाय्याने गळ्यावर वार करून 25 वर्षीय विवाहितेचा खून केला असल्याची घटना तालुक्यातील पट्टीवडगाव येथे उघडकीस आली. विरोध झुगारून आपल्या मुलासोबत विवाह केल्याचा राग मनात धरून सासर्‍याने सुनेचा घात केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान फरार असलेल्या संशयित सासऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.
बालासाहेब संभाजी लव्हारे याचा मुलगा अजय लव्हारे चा विवाह शितल सोबत पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. या लग्नास बाळासाहेब याने विरोध केला होता. हे लग्न झाल्यानंतर अजय लव्हारे हा बाहेरगावी राहत होता मात्र लॉकडाउनच्या काळात तो घरी परत आला. या जोडप्याला पत्नीने घरात घेतल्याचा राग बालासाहेबाच्या मनामध्ये होता. याच रागातून त्याने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शितल अजय लव्हारे या विवाहितेच्या गळ्यावर सासरा बालासाहेब संभाजी लव्हारे याने कूर्‍हाडीने वार केले. हा वाद सोडवण्यासाठी गेलेली सासू देखील यावेळी जखमी झाली. या घटनेत शीतला जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी मध्यरात्री च्या सुमारास घटनास्थळी भेट दिली. ही घटना घडल्यानंतर सासरा फरार झाला असून बर्दापूर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर या घटनेतील सत्य लवकरच समोर येणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close