आपला जिल्हा

कंटेनरच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

माजलगाव — भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे मोटारसायकल स्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना तेलगाव — दिंद्रुड रोडवर असलेल्या भोपा जिनिंग समोर सायंकाळच्या सुमारास घडली.

भोपा येथील 32 वर्षीय सत्यभान गंगाधर गवळी हे एम एच 44 जे 94 86 या मोटरसायकलवरून जात असताना भरधाव जाणाऱ्या कंटेनर क्र. डीएन 09एस 9705 ने जोराची धडक दिली.या अपघातात सत्यवान गवळी हे गाडीचा टायर खाली येऊन काही अंतर फरफटत गेले. यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close