आपला जिल्हा

अंत्ययात्रा थेट तहसील कार्यालयात नेऊन लिंगायत समाजाचे आंदोलन

धारूर — येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी वारंवार करून देखील प्रशासनाने अद्याप कारवाई केली नाही . परिणामी आज संतप्त झालेल्या लिंगायत समाजाच्या लोकांनी अंत्ययात्रा चक्क तहसिल कार्यालयात घेऊन जात आंदोलन केले.
        शहरातील लिंगायत समाजाची तहसील कार्यालयाच्या दक्षिणेस सर्वे नंबर 378 मध्ये स्मशानभूमी आहे. मात्र या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या वीस फूट रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे शववाहिका, जेसीबी येथून घेऊन जाणे अवघड बनले आहे. हा रस्ता खुला करावा यासाठी लिंगायत समाजाने वारंवार प्रशासनाकडे निवेदन देऊन देखील याची दखल घेतली गेली नाही. यापूर्वी देखील अशीच शवयात्रा थेट तहसील कार्यालयामध्ये घेऊन जाण्यात आली होती. यावेळी हा रस्ता लवकरच खुला करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही. आज 90 वर्षीय रामलिंग तांबवे या वृद्धाचे निधन झाल्यानंतर समाजाच्या लोकांनी थेट शवयात्रा तहसील कार्यालयात नेली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी आंदोलकांची समज काढून 31 ऑगस्टपर्यंत स्मशानभूमीचा रस्त्यावरील अतिक्रमण पाठवण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर दुसऱ्या रस्त्याने शव यात्रा घेऊन जात अंत्यविधी करण्यात आला ‌.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close