महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली

नागपूर — नागपूर महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी मुंबईत बदली करण्यात आली. असून सत्ताधारी भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जागी सनदी अधिकारी बी. राधाकृष्णन यांना नागपूरमध्ये पाठवण्यात येणार आहे.कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे सध्या गृह मूंढे विलगिकरणात आहेत ‌

मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांना त्वरित रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. मुंढे यांचा स्वभाव आणि कार्यशैली बघता राज्य सरकारानेच त्यांच्या मुसक्या आवळल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे तेरा वर्षाच्या कार्यकाळात मुंढे यांची ही बारावी बदली आहे.

मुंढे नागपूरला आले तेव्हा त्यांनी महापौर यांची भेट घेणेही टाळले होते. येताच त्यांनी बदल्या आणि निलंबनाचा धडाका लावला होता. त्यामुळे त्यांचे सत्ताधाऱ्यांशी विवाद झाले. स्मार्ट सिटी कंपनीच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे त्यांनी परस्पर हाती घेतली होती. या दरम्यान सुमारे २० कोटी रुपयांचे वाटप कंत्राटदारांना केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर केला होता. राज्याचे तत्कालीन प्रधान सचिव तसेच कंपनीचे अध्यक्ष प्रवीण परदेसी यांनी आपणास तोंडी स्मार्ट सिटीची सूत्रे स्वीकारण्यास सांगितले होते, असा दावाही मुंढे यांनी केला होता. मात्र त्यानंतर झालेल्या कंपनीच्या बैठकीत ते खोटे बोलल्याचे उघड झाले. अध्यक्षांनी आपण असे कुठलेच आदेश दिले नसल्याचे सांगून त्यांना तोंडघशी पाडले होते.

कोरोना रुग्णांचा परिसर प्रतिबंधित करण्यावरून त्यांचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्याशीसुद्धा चांगलेच वाजले होते. काँग्रेसच्या एका नगरसेवकांवर त्यांनी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले. त्यामुळे काँग्रेसचाही त्यांना विरोध होता. विशेष म्हणजे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा मुंढे यांची केंद्रीय नगरविकासमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली होती.
राज्य सरकारने इतरही काही बदल्या केल्या असून कैलास जाधव यांना नाशिकचे पालिका आयुक्त म्हणून जबाबदारी मिळाली आहे. एस. एस. पाटील यांना सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. अविनाश ढाकणे यांची परिवहन आयुक्त आणि डाॅ. एन. बी. गिते यांना महावितरणे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे. सी. के. डांगे यांची बदली संचालक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पुणे येथे करण्यात आली आहे.

मुंढे यांची बदली अपेक्षित नव्हती. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे पण त्यांच्या कामावर खूष होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या कामाला पाठिंबा दिला होता. तरीही त्यांची बदली झाल्याने मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close