आपला जिल्हा

पतीला कोरोना झाल्याचे समजताच पत्नीचा मृत्यू

बीड- बीड जिल्ह्यातील धारूर येथील शासकीय रुग्णालयात तपासणी केल्यानंतर पतीला कोरोना झाल्याचे पत्नीला समजताच एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील गावंदरा येथे घडली आहे.

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील गावंदरा येथील रहिवासी कुसाबाई बडे (वय 57) यांच्या पतीचा स्वॅब घेतल्यानंतर सोमवारी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर नियमाप्रमाणे आरोग्य विभागाने त्यांना उपचारासाठी धारूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. पतीला कोरोना झाल्याची माहिती पत्नी कुसाबाई बडे यांना समजल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्या दु:खात आणि भीतीच्या छायेखाली होत्या. मंगळवारी घरातील लोकांनी त्यांना झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला, पण त्या मृत अवस्थेत आढळल्या. या घटनेमुळे धारूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close