आपला जिल्हा

बीड मध्ये पावडर कोटिंगच्या दुकानात स्फोट एक ठार; तिन जखमी

बीड — पावडर कोटींगच्या दुकानात गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने 30 वर्षीय तरुण गंभीररीत्या जखमी झाला. त्यानंतर त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. तर अन्य तीन जण या घटनेत जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटना पांगरी रोडवर करपरा नदी जवळ आज दुपारी घडली.स्फोट इतका भयानक होता की आजूबाजूचा परिसर हादरला.

पांगरी रोडवर करपरा नदी जवळ संतोष गिराम या तीस वर्षीय तरुणाचे पावडर कोटिंग चे दुकान आहे. दुपारी स्लायडिंगचे काम सुरू असताना अचानक गॅस गळती होऊन झाला . भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर करपरा नदीचा परिसर हादरून गेला होता. या स्फोटांमध्ये संतोष गिराम हा युवक गंभीररित्या जखमी झाला‌. मात्र उपचार करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. या दुकानांमध्ये काम करणारे अन्य तीन कामगार देखील जखमी झाले स्फोटाचा आवाज ऐकू आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close