क्राईम

कंटेनमेंट झोन असलेल्या धारुरच्या गीता ज्ञान आश्रमात चोरांचा धुमाकूळ

धारूर — कोरोना पीडित व्यक्तीच्या घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरांनी हात साफ केल्याच्या घटना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घडत असतानाच चिंचपूर रोडवर असलेल्या गीता ज्ञान आश्रमात देखील चोरी झाल्याची घटना आज उघडकीस आली.या आश्रमातील बारा साधक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे हा आश्रम बंद करण्यात आला आहे.

चिंचपूर रोडवर असलेल्या गीता ज्ञान आश्रमातील 12 साधकांना कोरोणाची लागण झाल्याची घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर या आश्रमाला कंटेनमेंट झोन जाहीर करून हा आश्रम बंद करण्यात आला होता. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी आश्रमाचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश केला तसेच आतील पेट्यांची नासधूस करत किमती मुद्देमाल गायब केला. आश्रम परिसरात पेट्यांमध्ये असलेले कपडे अस्ताव्यस्त चोरट्यांनी टाकून दिले. मंगळवारी सकाळी काही जणांच्या नजरेस आश्रमाचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.या ठिकाणी सर्व नियमांचे पालन करून तपास करण्यात येईल असं धस यांनी सांगितलं. मात्र या घटनेत चोरट्यांनी किती मुद्देमाल चोरून नेला याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close