आपला जिल्हा

बोगस एन. ए. प्रकरण रजिस्ट्री ऑफिसने दाबले

कोट्यावधीचा बुडतोय महसूल

संगनमताने चालतेय बोगसगिरी -अॅड अजित देशमुख

बीड — बोगस एन. ए. आदेश लावून गेल्या कित्येक वर्षापासून बीडमध्ये खरेदीखते होत आहेत. यातून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे. रजिस्ट्रि ऑफिस मधील अधिकाऱ्यांना ही बाब माहीत असतानाही संगनमताने पैसे उकळून हा कारभार अद्याप चालू आहे. जिल्हाधिकार्‍यांनी अहवाल मागितल्यानंतर देखील गेल्या दोन महिन्यापासून रजिस्ट्रि ऑफिस अहवाल देत नसल्याचा आरोप जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केला आहे.

बीड शहरात मध्ये क्रमांक एक आणि दोन असे रजिस्ट्रीची दोन कार्यालय कार्यान्वित आहेत. या कार्यालयांमध्ये एकच एन. ए. ऑर्डर आणि ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वापरला जात आहे. त्याचप्रमाणे कुठलाही आदेश प्राप्त केलेला नसताना बोगस आदेश लावून देखील खरेदीखते नोंदवली जात आहेत.

एक नाही, दोन नाही, हजारावर अशा प्रकारची खरेदीखते गेल्या काही वर्षात झालेली आहेत. ही बाब जन आंदोलनाने जिल्हाधिकारी यांना निदर्शनास आणून दिली होती.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यात तातडीने लक्ष घालून अहवाल मागितला होता. मात्र बीडच्या रजिस्ट्री ऑफिसने अद्याप पर्यंत अहवाल दिलेला नाही. यावरून रजिस्ट्री ऑफिसमधील अधिकाऱ्यांना बोगस कामाची माहिती असून त्यांचे संगनमत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आज पर्यंत येथे झालेल्या बोगसगिरीला येथील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी आपण पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अहवाल न देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचेही देशमुख यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close