देश विदेश

काँग्रेसच्या अध्यक्षपदावर सोनिया गांधी कायम

नवी दिल्ली — काँग्रेस वर्किंग कमिटीच्या आज पार पडलेल्या बैठकीत सोनिया गांधी या काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचे एकमत झाले.याबरोबरच पुढील सहा महिन्यात नवीन अध्यक्ष निवडण्यात येणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले.

सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर राहायचे नाही असे स्पष्ट केले होते मात्र अनेक नेत्यांनी त्यांना या पदावर कायम राहण्याचा आग्रह केला. गेल्या दोन तीन आठवड्यापासून अध्यक्षपदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये घमासान सुरू असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज झालेली बैठक देखील वादळी ठरली. यावेळी सोनिया गांधी यांना अध्यक्षपदावरकायम राहण्याचा आग्रह माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, ए के अँटनी सह अनेक नेत्यांनी आवाहन केले काँग्रेसमधील जवळपास 23 नेत्यांनी नेतृत्वबदलाची मागणी केली होती. बैठकीत या पत्रावरून देखील राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांवरच निशाणा साधला. पत्र लिहिण्यासाठी हीच वेळ का निवडली ? असा प्रश्न त्यांनी केला. सोबतच नेत्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली असल्याचे वक्तव्य राहुल गांधींनी बैठकीत केलेच नसल्याचे देखील काँग्रेसने स्पष्ट केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close