आपला जिल्हा

परळी ग्रामीण पोलिसांनी चक्क गाढवालाच केली अटक!

परळी — पोलीस सध्या काय करतील याचा भरोसा राहिला नाही. कानपूर पोलिसांनी मास्क घातला नाही म्हणून एका बकरीला अटक केल्याची घटना 27 जुलै रोजी घडली होती. असाच काहीसा प्रकार परळी ग्रामीण पोलिसांनी देखील केला असून त्यांनी चक्क गाढवालाच ताब्यात घेतले. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका कर्मचार्‍याची देखील नियुक्ती करण्यात आली होती.

खरं तर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सातत्याने काम करत असते‌. यातून काही मजेशीर घटना घडत असल्याचे विषय नेहमीच चर्चेत येतात.असाच गमतीदार प्रकार परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात देखील घडला.त्याचे झाले असे की, परळी ग्रामीण पोलीसांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात काही दिवसांपूर्वी वृक्ष लागवड केली आहे. झाडेही बर्‍यापैकी आले. मात्र रविवारी एका गाढवाने यापैकी एक झाड खाल्ले. पोलीसांनी लावलेले झाड खाने म्हणजे मोठा गुन्हाच! गाढवाने झाड खाल्ल्याचं समजताच पोलीसांनी संबंधित गाढवाला ताब्यात घेऊन डांबुन टाकले. एव्हढेच नव्हे तर त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी एका जमादाराची नियुक्तीही करण्यात आली.
पोलीसांनी गाढवाला ताब्यात घेतल्याची बातमी शहरात पसरली आणि आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले. हा विषय मात्र जिल्ह्यात मोठ्या चवीने चर्चिला जाऊ लागला आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close