आपला जिल्हा

लोकाभिमुख कारभाराचे झाले कौतुक गेवराई नगर परिषदेला मिळाले पाच कोटी रुपयांचे पारितोषिक

      • हा शहरातील नागरिकांचा गौरव – नगराध्यक्ष सुशिल जवजांळ

गेवराई — लोकाभिमुख कारभाराने नावारूपाला आलेल्या गेवराई नगर परिषदेला ,भारत सरकारच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाने केलेल्या जवळपास चार हजार शहरांच्या “स्वच्छ सर्वेक्षण: 2020 मधील वर्गवारीत मानाचे स्थान मिळाले असून, देशात 50 वा , पश्चिम विभागात 21 वा, तर राज्यात विसावा क्रमांक पटकावला असून नपला पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले असल्याची माहिती गेवराई चे नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे. दरम्यान, नगर परिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा पुरस्कार मिळाला आहे. शहरातील नागरिकांचा आणि विशेषत महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद व सहभागाने नपला हे यश मिळाले आहे. त्यामुळे केन्द्र सरकारने दिलेला हा सन्मान शहरातील सर्व नागरीकांना समर्पित करत आहोत, अशी कृतज्ञता ही नगराध्यक्ष जवंजाळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त करून, युवा नेते बाळराजे पवार व आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांचेही त्यांनी विशेष आभार मानले आहेत. यावेळी नपचे उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र राक्षसभूवनकर यांची उपस्थिती होती. बक्षीस मिळालेली गेवराई नगर पालिका जिल्ह्य़ात पहीली तर मराठवाड्यातील दुसरी ठरली आहे. 

केन्द्रीय नगर विकास मंत्री ना. हरदिपसिंग पुरी यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2020 अभियानाची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने गेवराई नगर परिषदेला या अभिथानात महत्त्वाचे स्थान मिळाले असून, केन्द्रीय नगर विकास मंत्री ना. हरदिपसिंग पुरी यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2020 अभियानाची बुधवारी ता. 20 रोजी स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या यश मिळविलेल्या पालिकेच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्या अनुषंगाने गेवराई नगर परिषदेला या अभियानात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. देश पातळीवर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नपने
देशात 50 वा ,पश्चिम विभागात 21 वा, तर राज्यात विसावा क्रमांक पटकावला असून पाच कोटी रुपये बक्षिसाची मानकरी ठरलेली, गेवराई नगर परिषद जिल्ह्य़ात पहिली व मराठवाडा विभागात दुसरी आली असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आमचे मार्गदर्शक बाळराजे पवार व आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील गेवराई नपने विविध विकास कामे पूर्ण करून शहरातील नागरिकांना चांगल्या सोयी दिल्या आहेत. विशेष म्हणजे, आपली नगर परिषदे ही “क” दर्जाची आहे. असे असताना, स्वच्छतेच्या बाबतीत नपने यशस्वीपणे युद्ध पातळीवर काम केले जात असून, नगर परिषदेचे जवळपास शंभर कामगार स्वच्छतेच्या कामात कार्यरत आहेत. शहरातील ओला सुका कचरा गोळा करण्यासाठी 18 सायकल रिक्षा, 6 इलेक्ट्रॉनिक गाड्या, 4 ट्रॅक्टर आहे एक टेम्पो सतत नागरिकांना सेवा देत असल्याचे सांगून ते म्हणाले की
या आधी ही नपला पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. पून्हा एकदा मानाचा तुरा नपच्या शिरपेचात रोवला आहे. गेवराई शहरातील नागरिक, तत्कालीन मुख्याधिकारी भागवत बिघोत, विद्यमान मुख्याधिकारी उमेश ढाकणे, सर्व नगरसेवक व कर्मचार्‍यांनी घेतलेली मेहनत नपच्या कार्याचा गौरव करण्यासाठी उपयोगाची राहीली असल्याचे त्यांनी सांगितले.कचरा गोळा करून त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले जात आहे. घनकचरा प्रकल्प व खत निर्मिती केन्द्र उभे राहिले आहे. सध्या कोरोनांच्या पार्श्वभूमीवर गेवराई नगर परिषदेचे सर्व कर्मचारी व्यस्त असतानाही, स्वच्छतेच्या बाबतीत सर्वजण खुप मेहनत घेत असून, आपल्या सर्व कामगारांचा अभिमान वाटतो, असे ही शेवटी नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ यांनी सांगून, शहरातील सर्व नागरिकांनी या पुढेही अशीच साथ, सहकार्य व आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन ही त्यांनी यावेळी बोलताना केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close