आपला जिल्हा

बीड जिल्ह्याची कोरोना रुग्ण संख्या 82 वर

बीड — चार दिवस बीड जिल्ह्यात अॅंटीजन टेस्ट सुरू असताना, प्रयोगशाळेकडून आलेल्या अहवालात पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत घट आली होती ‌ मात्र आता पुन्हा आज आलेल्या अहवालात तब्बल 82 रुग्ण आढळले आहेत. 689 जणांच्या स्वॅब ची तपासणी केली यामध्ये 603 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीड व अंबाजोगाई चा रुग्ण संख्येचा आकडा वाढतच आहे मात्र परळीच्या रुग्ण संख्येत घट झाल्याचे दिसत आहे.
अंबाजोगाई –17
शहरातील रेणुका वसाहतीत चार खतीब गल्ली प्रशांत नगर माकेगाव मिया भाई कॉलनी गीता रोड हनुमान नगर चनई, एसआरटी परिसर अंबिका सोसायटी याठिकाणी हे 17 रुग्ण आढळले
बीड — 29
लोणार पुरा मारुती मंदिराजवळ दोन आदर्श नगर मध्ये 2 पोलीस कॉलनी पिंपळनेर मध्ये तीन पाटील वाडा अपार्टमेंट पोद्दार शाळेजवळ रंजेगाव पंढरी नगरी धानोरा रोड भक्ती कन्स्ट्रक्शन सोमेश्वर नगर शाहू विद्यालय शाहूनगर दोन,ससेवाडी मोहम्मदिया कॉलनी काजी नगर इंडिया बँक कॉलनी, वीरशैव व कॉलनी 2 गिराम नगर धांडे नगर, पात्रूड गल्ली सुभाष रोड महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनी वायकर वस्ती मांडवजाळी एकता नगर पेठ बीड शारदा अपार्टमेंट सारडा नगरी तसेच बीड कारागृहातील एक आरोपी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
केज — 1
हा रुग्ण शिवाजीनगर भागामध्ये सापडला आहे.
माजलगाव — 13
गुंज थडी येथे रुग्णाच्या संपर्कात आले दहा जण तसेच भाटवडगाव शिवार राजवाडी व केसापुरी कॅम्प येथील पॉझिटिव आलेले रुग्ण रहिवासी आहेत.
परळी — 2
पंचवटी नगर व स्नेहनगर मध्ये दोन रुग्ण सापडले.
शिरूर — 5
खालापूर येथे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले चार जण तर बावी येथे एक जण पॉझिटिव आला आहे.
वडवणी — 1
पंचायत समितीतील कर्मचारी पॉझिटिव्ह आला आहे.
गेवराई — 6
मोंढा रोड, तसेच पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेले चकलांबा पोलिस ठाण्याचे चार कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सुरुवातीला या पोलिस ठाण्याचे सात कर्मचारी काल पुन्हा चार व आज देखील चार कर्मचारी बाधित आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबरोबरच जुन्या बस स्टॅन्ड जवळ देखील एक रुग्ण सापडला आहे.
धारूर — 5
जाधव गल्ली डोंगर वेस तसेच अंजनडोह येथे पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेले तीन जण पॉझिटिव्ह आले आहेत.
आष्टी — 3
धामणगाव धानोरा याबरोबरच आष्टी शहरात एक रुग्ण आढळून आला

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close