आपला जिल्हा

स्पर्धांच्या माध्यमातून नवचैतन्याचा (सं) दीप पेटवण्याचा संदीप क्षीरसागरांचा प्रयत्न

बीड — कोरोना संकटाचा महामारीमूळे सुरु असलेला सातत्याचा लॉकडाऊन त्यामुळे जनतेचे खराब होत असलेले मानसिक आरोग्य लक्षात घेता कलेच्या माध्यमातून नवचैतन्याचा (सं)दीप विविध स्पर्धांच्या माध्यमातून प्रज्वलित करण्याचं काम आमदार संदीप क्षीरसागर वाढदिवसाच्या निमित्ताने करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कलावंतांसाठी आता भजन गायन स्पर्धेचे त्यांनी आयोजन केले आहे.

लोकप्रतिनिधी सामाजिक भान ठेवणारा बांधिलकी जोपासणारा असणं गरजेच असत. कलागुणांना जोपासल त्याला आश्रय दिला. तर तो समाज नवा आदर्श निर्माण करू शकतो हीच बांधीलकी आमदार संदीप क्षीरसागर यांनी जोपासली असल्याचे सध्या दिसत आहे. सध्या प्रत्येक घटक हा मानसिक दबावातून कोरुना संकटामुळे जात आहे अशा स्थितीत त्यांच मानसिक आरोग्य सुदृढ बनवत त्यांच्यात सकारात्मक भाव निर्माण करण्यासाठी वाढदिवसाचा निमित्त साधून विविध स्पर्धा आमदार संदीप क्षीरसागर यांनी ठेवल्या आहेत. पोळा सणानिमित्त रंगरंगोटी केलेल्या सर्जा राजाचे व गोधनाचे फोटो मागवत स्पर्धा आयोजित केली. मुलांच्या बाबतीत पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून ते दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा असो याच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्याचा काम त्यांनी केलं. सोशल डिस्टंसिंग नियमामुळे भजन गायन सध्या बंद आहे. हा कलावंतांचा वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्यासाठी देखील भजन गायन स्पर्धा आयोजित केली. विशेष म्हणजे शासकीय नियम कुठेही उल्लंघन होणार नाही स्पर्धा निकोप व्हावी याचं नव उदाहरण त्यांनी घालून दिल आहे. अभंग गवळण भावगीत गायलेली चार मिनिटांची क्लिप मोबाईलच्या माध्यमातून 25 ऑगस्ट रोजी पाच वाजेपर्यंत पाठवण्याच आवाहन संयोजकांनी केला आहे. मो.९८३०४५७१७ किंवा ९८५९४४४४०० या व्हाट्सएप नंबरवर पाठवावी. या स्पर्धेच्या विजेत्यांची पारितोषिके खालील प्रमाणे आहेत. त्यासाठी बक्षिसांची रक्कम देखील घसघशीत ठेवली आहे‌.
प्रथम पारितोषिक ५००० रु.
अशोक वाघमारे (सरचिटणीस, रा.कॉ.जि.बीड.),द्वितीय पारितोषिक ३००० रु.उत्रेश्वर सोनवणे (पं.स.सदस्य,बीड),तृतीय पारितोषिक २००० रु.भाऊसाहेब डावकर (कार्यकारणी सदस्य रा.कॉ.बीड)
उत्कृष्ट गायकासाठी ५०० रुपयांची पाच पारितोषिक रामचंद्र जाधव (युवा नेते रा.कॉ.बीड),यांनी जाहीर केलेली आहेत. बीड तालुका व मतदारसंघ अंतर्गत ही स्पर्धा आहे. भजनात फक्त अभंग, गवळणी, भावगीत एवढ्याच पुरत्या मर्यादितच फक्त चार मिनिटाचीच क्लिप पाठवावी.त्या बरोबर आपले नाव, गावसहीत संपुर्ण पत्ता व मोबाईल नंबर ही पाठवावा आणि कोविड १९ साठी शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता स्पर्धकांनी घ्यावी. व जास्तीत जास्त मतदार संघातील स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close