आपला जिल्हा

Coronavirus: बीड जिल्ह्यात सापडले 61 रुग्ण

चौसाळयात पुन्हा रुग्ण सापडला

बीड — जिल्ह्यातून प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेल्या 486 स्वॅबचा अहवालात ‌ 61 रुग्ण सापडले आहेत. 424 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. परळी माजलगाव अंबाजोगाई मध्ये केलेल्या एंटीजन टेस्टमध्ये 172 रुग्ण आढळून आले होते.
अंबाजोगाई — 12
चौसाळकर कॉलनी मध्ये दोन नागझरी ग्रामीणमध्ये हे दोन मंगळवार पेठ मध्ये तीन, मंडी बाजार, गवळीपुरा मांजरा कॉलनी, मंगळवार पेठ, तडोळा ग्रामीण मध्ये रुग्ण सापडले
बीड — 26
शहरातील विप्र नगर भागात तीन महात्मा फुले नगर शनिवार पेठ वारद अपार्टमेंट सारडा नगरी, सोमेश्वर नगर, गणपती नगर, आदर्श नगर पोलीस कॉलनी पिंपळनेर, सह्योग नगर पूर्व तर साधना बिल्डींग सारडा नगर मध्ये पाच, विठ्ठल अपार्टमेंट भक्ती कन्स्ट्रक्शन, फुलाई नगर कृष्ण मंदिर रोड दोन, पंचशील नगर संभाजीनगर, पठाण वस्ती मंजेरी हवेली व चौसाळा येथे एक रुग्ण सापडला आहे.
धारूर — 5
चांभारवाडा, पाटील गल्ली मध्ये दोन, कट घर पुरा, वडगावकर गल्ली येथील संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
गेवराई — 7
वडगावकर गल्ली मालेगाव बुद्रुक, हिरापूर, मादळमोही याबरोबरच चकलांबा पोलिस ठाण्याचे चार कर्मचारी पुन्हा पॉझिटिव आले आहेत. कालच्या अहवालात चकलांबा पोलीस ठाण्याच्या सात कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव आले होते
केज — 4
कानडी माळी सादोळा नाई वाडी गल्ली देवगाव येथे रुग्ण सापडले.
परळी — 2
शंकर पार्वती नगर व पांगरी येथील हे रुग्ण आहेत.
पाटोदा 2
रास्ता गल्लीमध्ये हे दोन रुग्ण सापडले आहेत एक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहे.
वडवणी — 1
शहरातील राम मंदिरा जवळ हा रुग्ण सापडला आहे.
आष्टी — 2
ग्रामीण रुग्णालयाच्या निवासस्थानातील व कुंभार वाडी गल्ली धानोरा येथील रहिवासी असलेले हे रुग्ण आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close