आपला जिल्हा

Antigen test:परळी माजलगाव अंबाजोगाईत सापडले 172 रुग्ण

बीड — जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये व्यापाऱ्यांची तीन दिवस अॅन्टिजन टेस्ट करण्यात आली होती.चौथ्या दिवशीदेखील परळी अंबाजोगाई माजलगाव या तीन शहरांमध्ये टेस्ट घेण्यात आली . यामध्ये 172 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.


जिल्ह्यातील वाढते संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.व्यापक मोहिमेचा एक भाग म्हणून व्यापाऱ्यांची अँटीजन टेस्ट हाती घेण्यात आली होती. माजलगाव परळी व अंबाजोगाई या शहरांमधील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता चौथ्या दिवशी देखील टेस्ट घेण्यात आली. चौथ्या दिवशी तब्बल 2148 व्यापार्‍यांची टेस्ट करण्यात आली यामध्ये 172 जण पॉझिटिव्ह आढळून आले.परळीमध्ये सर्वाधिक 76 तर माजलगाव मध्ये 66 रुग्ण सापडले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close