महाराष्ट्र

वेब न्यूज पोर्टलांमुळे ‘देता का छापू’ खंडणीखोरांचे पितळ पडतेय उघड

माहिती आणि प्रसार मंत्री प्रकाश जावडेकरांच्या नावाने सोशल मीडियावर फिरवताय खोटा मेसेज

खोटा मेसेज फिरवणाऱ्या षंढाविरुद्ध कारवाईची असोसिएशन ऑफ डिजिटल मीडियाची मागणी

बीड — वेब न्यूज पोर्टलच्या पत्रकारितेमुळे तथाकथित ‘देता का छापू’ खंडणीखोर पत्रकारांचे पितळ उघडे पडत असल्याने त्यांनी माहिती आणि प्रसार मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या नावाने सोशल मिडिया वर खोटा मेसेज फिरवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे डिजिटल मीडियाची बदनामी आणि मानहानी करण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अशाप्रकारे बनावट पत्रकार कार्यरत असून सोशल मीडियावर खोटे आणि दिशाभूल करणारे संदेश व्हायरल करणार्‍या षंड लोकांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागांना द्याव्यात, अशी मागणी असोसिएशन ऑफ डिजिटल मीडिया अँड इंडिपेंडेंट न्यूज पोर्टलने केली आहे.

असोसिएशन ऑफ डिजिटल मीडिया अँड इंडिपेंडेंट न्यूज पोर्टल प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन माहिती आणि प्रसार मंत्री प्रकाश जावडेकर यांना पाठवले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात व्हॉट्सअप आणि फेसबुक या सोशल मिडियाच्या माध्यमातून माहिती आणि प्रसार मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या नावाने संदेश तयार करुन डिजिटल मीडियाच्या पत्रकारांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याच्या खोडसाळ अफवा पसरवल्या जात आहेत. अफवा पसरविण्यामागे काही तथाकथित संघटना कार्यरत असून लोकांना खंडणी मागणे, ब्लॅकमेल करणे, बोगस पेपरांना संरक्षण देणे असे काम केले जात असल्याचे संस्थेच्या निदर्शनास आले आहे. चांगले काम करणार्‍या अधिकार्‍यांना ब्लॅकमेल करणे, राजकीय पक्षांचा अजेंडा चालवणे, पत्रकारितेच्या नावावर खंडणी मागणे, खोट्या बातम्या प्रसिद्ध करून अनेकांची बदनामी करणे, यासर्व बाबीला डिजिटल मीडियामुळे आळा बसलेला आहे. कारण डिजिटल मिडियामुळे कोणतीही बातमी लपून राहत नाही व ती तात्काळ लोकांपर्यंत पोहोचत आहे. तथापी त्यामुळे काही तथाकथित खंडणीखोरांचे पितळ उघडे पडत असून त्यांच्या दुकानदाऱ्याही बंद झाल्याने ते डिजिटल मीडियाबाबत उलट-सुलट संदेश सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. सध्या कोरोना विषाणुच्या पार्श्‍वभूमीवर प्रिंट, इलेक्टॉानिक मिडिया याबरोबरच डिजिटल मिडिया महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत उत्कृष्टरितीने कार्यरत असताना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारले जात आहे. त्याचा फायदा लोकांना होत असताना अशा तथाकथित लोकांमुळे डिजिटल इंडिया (मिडिया) बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आपण या बाबींची गंभीरपणे दखल घेवून व्हायरल संदेशाबाबत आपल्या पातळीवर चौकशी करावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी असोसिएशन ऑफ डिजिटल मीडिया अँड इंडिपेंडेंट न्यूज पोर्टलने केली आहे.

आरएनआय नोंदणीचा होतोय गैरवापर

बोगस पत्रकारांवर कारवाई झाली पाहिजे या मतावर संस्था ठाम असून जे पत्रकार केवळ कागदोपत्री त्यांचे साप्ताहिक, दैनिक प्रसिद्ध करतात, केवळ शासकीय जाहिरात असेल तर त्या दिवशी पेपरचा अंक काढला जातो, आरएनआय (RNI)केवळ प्रिंट काढण्यासाठी मान्यता देते, मात्र काही तथाकथित लोक आरएनआय नोंदणीचा वापर न्यूज वेबसाईटसाठी करीत असल्याची गंभीर बाब महाराष्ट्र राज्यात सुरू असून आरएनआय नोंदणी असलेली वेबसाईट असल्याचे सांगून अनेक नव पत्रकार युवक, युवतींना अधिकृत आरएनआय ओखळपत्र (कार्ड) च्या नावाखाली पैसे उकळत असल्याच्या तक्रारीही संस्थेकडे प्राप्त झाल्या आहेत. यासर्व जाहिरातीमध्ये आपल्या नावाचा गैरवापर करण्यात आला आहे. आरएनआय वेबसाईटला प्रकाश जावडेकर यांच्या मंत्रालयाची मान्यता असल्याचा दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून करुन दिशाभूल करणारे संदेशातून केला जात आहे. प्रभात न्यूज, वेलकम इंडिया या नावाने काही वर्तमानपत्रातील कात्रणावर आपला फोटो प्रसिद्ध करून डिजिटल मीडियाची बदनामी आणि मानहानी करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

वेब न्यूज पोर्टलची उद्यम मंत्रालय अंतर्गत नोंदणी

असोसिएशन ऑफ डिजिटल मीडिया अँड इंडिपेंडेंट न्यूज पोर्टल ही संस्था डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी कार्यरत संस्था आहे. महाराष्ट्र राज्य व भारतात ३ हजारांहून जास्त वेब न्यूज पोर्टल (वेबसाईट्) चे पत्रकार, प्रतिनिधी व संपादक हे संस्थेचे मानद सभासद आहेत. या संस्थेकडून सभासद फी म्हणून कोणतेही शुल्क आकारले जात नसून केवळ डिजिटल मिडियामध्ये कार्यरत असणारे व स्वत:ची वेबसाईट असावी ही एकमात्र सभासद पात्रतेची अट आहे. संस्थेच्या सर्व सभासदांच्या वेबसाईट् पूर्वीचे उद्योग व आताचे उद्यम मंत्रालय अंतर्गत नोंदणी केलेल्या आहेत. या संस्थेचा सभासद असलेला कोणताही सदस्य वेब न्यूज पोर्टल (वेबसाईट) वर फेक न्यूज प्रसिद्ध करीत नाही, असेही संस्थेने स्पष्ट केले आहे.

डिजिटल इंडियाची प्रेरणा घेवून होतेय काम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशात डिजिटल इंडिया अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत असून याच डिजिटल इंडियाची प्रेरणा घेवून तालुका व जिल्हा पातळीवर अनेक पत्रकार स्वतःचे वेब न्यूज पोर्टल (वेबसाईट) संचालन करीत आहेत. वेब न्यूज पोर्टलसाठी महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण पत्रकारांनी स्वतःची आर्थिक गुंतवणूक करून डिजिटल मीडिया वेबसाईट सुरू केले आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या शासकीय योजना व अन्य माहिती तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे. डिजिटल इंडियाचे फायदे व तोटे सर्व नागरिकांना ज्ञात होत असून ग्रामीण भागामध्ये डिजिटल मीडियाचे पत्रकारांबाबत लोकांमध्ये सन्माननीय भावना आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close