आपला जिल्हा

कोरोना आजारावरील आणखी एक औषध बाजारात

“नवी दिल्ली —  जोपर्यंत कोरोणा ची लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोरोनावरील उपायांसाठी देशातील अनेक औषधांना मान्यता देण्यात आली आहे. आता देशातील नामवंत डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजने कोरोनावर एक औषध लॉन्च केलं आहे. त्यांनी हे औषध 200 एमजी टॅबलेटच्या स्वरूपात लॉन्च केलं आहे.

कोरोनावर उपयुक्त मानले जाणारे औषध फेविपिरावीरला विविध कंपन्या वेगवेगळ्या नावाने लॉन्च करत आहेत. डॉ रेड्डी लॅबोरेटरीजने कोरोनावर एक औषध लॉन्च केलं आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाला या औषधाच्या उपयोगासाठी मान्यता मिळाली आहे. डॉ रेड्डी लॅबोरेटरीज नुसार, ‘एविगन’ या औषधाचा वापर हलक्या आणि मध्यम कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर करता येऊ शकतो. कंपनीने फुजिफीम टोयामा केमिकल कंपनी लिमिटेड सोबत औषधांच्या निर्मितीसाठी आणि वितरणासाठी करार केला आहे. डॉ रेड्डी लॅबोरेटरीजच्या मते, कंपनीने हे औषध 122 टॅबलेटच्या रुपात बाजारात आणले आहे. याची एक्सपायरी 2 वर्षांपर्यंत राहील. आनंदाची बाब ही आहे की, देशातील 42 शहरांना फ्री होम डिलिव्हरी दिली जाणार आहे.

‘एविगन’ औषध मागवायचं असेल तर डॉ रेड्डी लॅबोरेटरीजने त्यांच्या वेबसाईटवर एक टोल फ्री नंबर देखील दिला आहे. या नंबरवर संपर्क करून तुम्ही हे औषध मागवू शकता. मात्र कंपनीने औषधाच्या किमतीबाबत कोनताही खुलासा केला नाही. काही दिवसांपूर्वीच जेनेरिक फार्मा कंपनी एनएसएन ग्रुपने कोरोनावरील सर्वात स्वस्त औषध ‘फेविलो’ लॉन्च केलं होतं. त्याच्या एका टॅबलेटची किंमत 33 रुपये इतकी आहे. कंपनीने सांगितले की लवकरच 400 एमजी टॅबलेटच्या स्वरूपात औषध लॉन्च केलं आहे. हैद्राबादच्या ली-फार्मा कंपनीने देखील कोरोनावरील फेरीपिरावीर औषध ‘फरावीर’ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे डायरेक्टर रघु मित्रा यांनी सांगितले की पुढच्या महिन्यात हे औषध बाजारात येईल. याच्या एका टॅबलेटची किंमत 27 रुपये इतकी असेल.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close