देश विदेश

सुशांत मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआय टीम मुंबईत दाखल

मुंबई — अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआय कडे सर्वोच्च न्यायालयाने सोपविल्यानंतर सीबीआयची टीम पुढील तपासासाठी मुंबईत दाखल झाली आहे. सीबीआयचे 4 अधिकारी मुंबईत पोहचले असून, दुसरी टीम आज रात्रीत मुंबईत दाखल होईल. सीबीआयच्या या 16 सदस्यांना क्वारंटाईन केले जाणार नाही. या टीमने क्वारंटाईनच्या नियमात सूट मागितली होती, जी मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सीबीआयची टीम आता मुंबई पोलिसांकडून घटनेच्या स्थळाचे फोटो घेईल. तपासासाठी एसआयटी टीम टेक्निकल, फोरेंसिंक आणि इतर गोष्टींची मदत घेईल. सुशांतच्या घरी पुन्हा एकदा क्राईम सीनला क्रिएट केले जाईल. बिहार पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारवर टीम तपास करेल.

या टीमचे नेतृत्व सीबीआयचे जॉइंट डायरेक्टर मनोज शशिधर करत आहेत. याशिवाय गगनदीप गंभीर, नुपूर प्रसाद आणि अनिल यादव हे या टीमचा भाग आहेत.  

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close