आपला जिल्हा

अॅन्टीजन टेस्टमध्ये बीड जिल्ह्यात सापडले 248 कोरोना बाधित

बीड — जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये सुरू असलेल्या व्यापाऱ्यांच्या अॅन्टीजन टेस्टमध्ये 248 कोरोना बाधित असल्याचे उघडकीस आले. आज परळी शहरात कोरोना रूग्णांनी शतक पूर्ण केले. त्यानंतर सर्वाधिक 62 रुग्ण माजलगाव शहरात आढळून आले. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यापार्‍यांसह आता तीन दिवसातील 6 शहरातील पॉझिटिव्ह व्यापार्‍यांची संख्या 690 झाली आहे.

अंबाजोगाई, आष्टी, केज, माजलगाव, परळीत 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान व्यापारी व इतर सर्व व्यावसायिकांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाकडून सुरु होती. त्यात 19 ऑगस्ट रोजी 6189 अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 230 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले. 18 ऑगस्ट रोजी 5769 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या त्यात 212 जण पॉझिटिव्ह आढळून आले. टेस्टच्या तिसऱ्या दिवशी 5877 जणांची तपासणी करण्यात आली यामध्ये 248 व्यापारी आढळून आले. परळी मध्ये सर्वाधिक 100 माजलगाव मध्ये 62 अंबाजोगाईत 38 केज मध्ये 28 तर आष्टीत 20 पॉझिटिव वाढले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close