आपला जिल्हा

हूऽऽऽ श्श ! बीड जिल्ह्यात आढळले फक्त 39 कोरोना रुग्ण

बीड — एकीकडे एंटीजन टेस्टमध्ये 230 रुग्ण पाच तालुक्यांमध्ये सापडलेले असतानाच दुसरीकडे मात्र प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेल्या 547 संशयित रुग्णांच्या अहवालामध्ये 39 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या आकडेवारीमुळे जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.
अंबाजोगाई — 6
शहरातील क्रांतीनगर, एसआरटी परिसर, अंबिका सोसायटी पोखरी रोड तसेच ग्रामीण भागातील वैजवाडी, कांगणेवाडी येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
बीड — 20
शहरातील नागोबा गल्ली ,गुरुदत्त अपार्टमेंट जवळ, सावता माळी चौक ,आयटीआय च्या मागे, गणेश नगर बलभीम नगर कालिका नगर ढगे कॉलनी बार्शी नाका संभाजीनगर लेंडी रोड चंपावती नगर नाथ नगर पालवन चौक विप्र नगर तर ग्रामीण भागात नाळवंडी पाली याठिकाणी बाधित रुग्ण आढळले.
धारूर –1
संभाजी चौक परिसरात पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेली 22 वर्षीय महिला पॉझिटिव आढळली.
केज — 3
तालुक्यातील सादोळा शिरपूरा तसेच समर्थ नगर मध्ये हे रुग्ण आढळले.
माजलगाव — 2
गंगाखेड व पाटील गल्ली मध्ये हे नवीन 60 वर्षीय रुग्ण आढळले.
पाटोदा — 3
शहरातील शारदा हॉस्पिटल मधील एक कर्मचारी नफरवाडी पारगाव घुमरा तसेच शहरात 30 वर्षीय पुरुष बाधित आढळला.
शिरूर — 3
तालुक्यातील आनंदगाव येथे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोन 27 वर्षीय महिला व शिरापूर धुमाळ येथे नवीन 60 वर्षीय महिला पॉझिटिव आली आहे.
वडवणी — 1
तीगाव मध्ये पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे 34 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close